उळवी : जोयडा तालुक्यातील उळवी श्री चन्नबसवेश्वर यात्रेला जाणाऱ्या एका बैलगाडीला अपघात झाल्याने बैलगाडी खाली सापडून एक जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या बैलगाडी मालकाचे नाव ईरांना शिवबसया दोडपाल वय 26 राहणार
संपगाव तालुका बैलहोंगल असे आहे. याबाबत मिळालेली माहिती की जोयडा तालुक्यातील उळवी येथील श्री चंनबसवेश्वर देवाची यात्रा दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रोत्सवात प्रामुख्याने बैलहोंगल तालुक्यातील चनबसवेश्वर देवाचे भक्त बैलगाड्या करून आपल्या कुटुंबासमवेत यात्रेला जात असतात. यावर्षी देखील माघ पौर्णिमेच्या यात्रेसाठी जाणाऱ्या बैलहोगल तालुक्यातील संपगाव येथील ईराणा शिवबसया दोपडाल वय 26 यांचे कुटुंबीय एका बैलगाडीतून जात होते. जोयडा तालुक्यातील फसोली क्रॉस जवळ बैलगाडी एका दगडाला पलटी झाल्याने त्याखाली सापडून इरांना दोपडाल हे गंभीर जखमी झाले. दरम्यान झोपडल कुटुंबातील आणखी चार जण बैलगाडी पाठोपाठ पायी चालत जात होते. बैलगाडी पलटी होताच तातडीने त्या ठिकाणी त्यांनी धाव घेऊन इरांना यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जोयडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यावर उपचार झाला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे भाविकात एकच हळहळ व्यक्त होत आहे
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यापासून जनावरांना लम्पि रोग सुरू झाल्याने उलवी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी बैलगाडीला निर्बंध घालण्यात आले होते.पण माघ महिन्यात होणाऱ्या पौर्णिमेचे निमित्त साधून सदर निर्बंध शनिवारीच येथील देवस्थान कमिटीने हटवले आहेत. त्यामुळे या ठिकाणी यावर्षीही बैलगाडीतून येणारे भाविक मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत. पण अशातच एका बैलगाडीला झालेला हा अपघातमुळे झालेला दुर्दैवी मृत्यू येथील भाविकात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची जोयडा पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी ही पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात उशिरा दिला. या घटनेमुळे संपगाव येथील त्यांच्या कुटुंबात व गावात एकच शोकळा पसरली आहे.