IMG-20230206-WA0084

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आगामी विधानसभेची रणनीती आखण्यात येत असून खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समिती भक्कम करण्यासाठी पुन्हा एकदा नूतन पदाधिकारी कामाला लागले आहेत. त्या अनुषंगाने येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुकाने उमेदवारीसाठीअर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले असून सोमवारी अशा एका परिपत्रकाचे वितरण खानापूर शहरात पदाधिकाऱ्यांनी केले. या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या निकालाच्या अंतिम क्षणी , आपण सर्वजण म.ए. समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र राहून येणारी विधानसभा निवडणूक जिंकणे ही काळाची गरज आहे. आपापसातील सर्व मतभेद व मनभेद गाडुन 66 वर्षांची सीमाप्रश्नाची चळवळ वाया जावू नये म्हणून प्रत्येक मराठी भाषिकांने सर्व गैरसमज दूर करून म .ए .समितीचा ” भगवा झेंडा ” पून्हा विजयी करणे , आणि वाडवडीलांचे महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण करणे. हेच आम्हां सर्वांचे आद्य कर्तव्य आहे . खानापूर तालूका म . ए . समिती आता एकसंघ आहे . या सीमाप्रश्नाच्या अंतिम क्षणी, बेकी करणाऱ्या कुठल्याही लोकांसमोर झोकु नका. भाजप काँग्रेस व जे.डी.एस. सारखे राष्ट्रीय पक्ष आपल्या मराठी भाषिक जनतेला वेग – वेगळी आमिषे दाखवत स्वाभिमानी मराठी माणसांची मते विकत घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करीत आहेत .पण हुतात्म्यांचे बलिदान , मराठी माणसांच्या पाठीवर उठलेले लाट्याकाठ्यांचे वळ ” व ” कर्नाटक सरकारचा अत्याचार , प्रत्येक मराठी माणुस कदापी विसरणार नाही. म . ए .समिती ही सर्व सामान्य जनतेच्या निढळ अस्मितेवर आधारीत आहे. तरी समितीच्या मतदाराने बांधिलकी राखावी असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
विधानसभा निवडणूक लढवू इच्छीणाऱ्यांनी आपला उमेदवारी अर्ज स्व – हस्ताक्षरांत लिहून म . ए . समितीला रु . 51 हजार , देणगीसह दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी 11 ते 2 या वेळेत शिवस्मारक खानापूर येथे आणून द्यावे , ( अनामत रक्कम ( डिपॉजीट ) नंतर कळविण्यात येईल .
एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले असून सदर पत्रकाचे वितरण खानापूर शहरात सोमवारी करण्यात आले यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई कार्याध्यक्ष यशवंत बिरजे माजी आमदार दिगंबर पाटील सचिव सिताराम बेडरे, आबासाहेब दळवी पांडुरंग सावंत, निरंजन सरदेसाई रुखमना झुंजवाडकर तसेच समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us