खानापूर प्रतिनिधी:
तालुक्यातील इदलहोंड येथे वीट भट्ट्या मारण्यासाठी आलेल्या कामगारांच्या झोपडपट्ट्यांना अचानकपणे आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. वीट कॉन्ट्रॅक्टर संजय चांगप्पा जाधव यांच्या शेतवडीत चार कामगार कुटुंबे आपल्या झोपड्या घालून विटा मारण्यासाठी वास्तवात आहेत.
शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास एका झोपडपट्टीला अचानकपणे आग लागल्याने बघता बघता जवळपास असलेल्या चारही झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या. यामध्ये सदर वीट कामगारांचे जिवलपोगी साहित्य व कपडेलते जळून खाक झाले आहेत.यामुळे त्या कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही याबाबत तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठ्याने पंचनामा केला आहे