मनतूर्गा: राजकारण हा एक समाजसेवेचा भाग आहे. राजकारणाला सोडून समाज नाही, समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी राजकारणाशी निगडित असतात. सांस्कृतिक कार्यक्रम,नाटक स्पर्धा अथवा कोणतेही समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असताना राजकारणी व्यक्तीशिवाय व्यासपीठ होत नाही. त्यामुळे व्यासपीठ आणि, समोर बसलेले प्रेक्षक ह्या दोन्ही गोष्टी राजकारणाच्या पाठीमागे लोकशाहीचा घटक आहे. म्हणून आत्मीय संवाद साधण्यासाठी स्पर्धा सारख्या व्यासपीठावरून संबोधन करणे हे गरजेचे बनते. यासाठी अशा स्पर्धांच्या माध्यमातून राजकारणी लोक मतदाराशी संवाद मंथन करत असतात. आम्ही विधानसभेच्या राजकारणात आपणही भाजपच्या पाठीशी राहून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले पाठबळ अत्यंत महत्त्वाचेअसल्याचे असे विचार भाजपा नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले .
मणतुर्गा येथे शिवजयंती व महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री गजानन पाटील पुरस्कृत रेकॉर्ड डान्स स्पर्धा रविवारी सायंकाळी उत्साहात पार पडल्या. यावेळी ते उद्घाटक या नात्याने बोलत होते.
कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी पी के पी एस सी संचालक शंकर पाटील राज्य व निगमचे संचालक सुरेश देसाई भाजपाचे माजी प्रदान कारदर्शी मारुती पाटील भाजपा प्रकोष्ट किरण येळूरकर, सदानंद होसुरकर माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई आदी उपस्थित होते. यावेळी गजानन पाटील यांच्या या उपक्रमाबद्दल उपस्थित त्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय कुबल म्हणाले खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी आता सर्व समावेशक पार्टी झाली आहे प्रत्येक गावागावांमध्ये भाजपचा कार्यकर्ता निर्माण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत देखील या भागातील जनतेने भाजपच्या पाठीशी राहावे व देश धर्म संस्कृती जतन करण्यासाठी कार्यरत राहावे असे आवाहन केले जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी स्पर्धातून स्फूर्ती मिळते आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धकांना वाव देण्याचे काम अशा स्पर्धा करतात अशा स्पर्धा अंतर्गत होणारी व्यासपीठेही समाजप्रबोधनाची केंद्रीय ठरतात असे सांगून त्यांनी भाजपच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी राहावे असे आवाहन केले. या स्पर्धेमध्ये 30 हून अधिक स्पर्धा आणि भाग घेतला होता.