खानापूर :
विद्यार्थी जीवन हे बालपणातील उभ्या कुणाचा पाया आहे उत्तम शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी प्रत्येक कलांमध्ये आपले कौशल्य दाखवले पाहिजेत सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यां आपल्या कलेचा अविष्कार दाखवण्याचा प्रयत्न करतात तो मनाला अल्हाद देणारा ठरतो शिवाय यामुळे जीवनातील ताण तणावावर मात करता येते. जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचे बळ प्राप्त होते. त्याकरिता मनमुराद जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कला हि आत्मसात करावी असे प्रतिपादन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी केले. ते माळ अंकले (ता. खानापूर) येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष रवळू निडगलकर होते.
आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील म्हणाले, बाल वयातच विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन दिल्यास भविष्यात ग्रामीण भागातून उत्तम कलावंत घडण्यास वेळ लागणार नाही.
कार्यक्रमात उद्घाटन भाजप नेते विठ्ठल हलगेकर, भरमाणी पाटील, ग्रामपंचायत सदस्य यल्लापा होसुरकर ,भोमानी येळुरकर, वैशाली धबाले आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रात्री विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले. कार्यक्रमाला लक्ष्मण होसुरकर, रेखा गुरव, परशराम कुंभार, उदय पाटील, यल्लाप्पा होसुरकर आदि उपस्थित होते.