खानापूर / प्रतिनिधी: अलीकडच्या वैज्ञानिक युगातही स्मशानभूमी ही अपशकुन व भीतीची जागा समजली जाते. त्यामुळे अनेक जण रात्रीच्या वेळी स्मशानभूमीकडे फिरकूनही जात नाहीत. पण याला काही परदेशी पाहुण्यांनी खानापुरात अपवाद ठरविला, खानापूर नदी काठाजवळील चौगुले यांच्या शेततळीत नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत दोन परदेशी पाहुण्यांनी (फॉरेनर्सनी) चक्क स्मशानभूमीत निवांतपणे झोप काढून अंधश्रद्धेला फाटा दिला आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, खानापूर बेळगाव भागातून अनेक परदेशी प्रवासी ये जा करत असतात. बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन बुलेट वरून येणाऱ्या परदेशी स्वार पाहुण्यांनी रात्रीच्या अंधारात मलप्रभा नदीच्या काठाच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीची जागा शोधली. व स्मशानभूमीच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्याच्या लोखंडी ौथर्याच्या बाजूला कापडी दोन झोले बांधून त्यामध्ये रात्रभर निवांत झोप काढत असल्याचा प्रकार पहाटे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आला.