खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प गावातून यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या 35 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. सदर विषबाधित रुग्णांना खानापूर येथील शासकीय रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आले. यापैकी पाच जणांची प्रकृती थोडीफार गंभीर असल्याने त्यांना बेळगाव येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर खानापूर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या वर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्राने सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती की, खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प गावातून 35 भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे दर्शन घेऊन जेवण उरकून गावाकडे परतत असताना काहींना उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. गावात परतल्यानंतरही त्यांना पुन्हा प्रकृतीचा त्रास होत असल्याने खानापूर सार्वजनिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. मा. जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर गावातील सर्व लोकांना दवाखान्यात तातडीने दाखल करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले
दरम्यान, भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी याची माहिती मिळताच त्वरित खानापूर सरकारी रूग्णालयात जाऊन ग्रामस्थांच्या प्रकृतीची विचारपूस केली व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून सर्वजण स्वस्थ असल्याची माहिती घेतली. यावेळी लैला शुगर्स कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील आदी उपस्थित होते.
सर्वच राजकीय नेत्यांची रुग्णालयाकडे धाव
मोदेकोप येतील 35 जणांना खानापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळताच खानापूर तालुक्यातील सर्व राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयाकडे धाव घेतली भाजप नेते विठ्ठल हलगेकर याने लागली. त्याचप्रमाणे माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी संजय कुबल पंडित ओगलेसह त्याच दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेमंडळी, आमदार अंजली निंबाळकर यांनीही दवाखान्यात तातडीने धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली