करंजाळ: गाय ही हिंदूंची देवता मानली जाते. पण याच गोमातेच्या शरीरावर कोणीतरी कुऱ्हाडीने घाव केला तर मनाला वेदना होतात. गो -हत्या सारखी प्रकरणे होत असताना हिंदूंच्या भावना दुखावतात. त्यामुळे अशा प्रकाराला कडवा विरोध आहेच. पण आपल्याच समाजातील काही समाजकंटकानी गोमातेला कुऱ्हाडीने घाव घालून जखमी करत असतील तर त्याचा निषेध झाला पाहिजे. अशा प्रकारे खानापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या गोठ्या पाठीमागे सोडलेल्या देशी गाईला कुऱ्हाडीने गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, करंजाळ तालुका खानापूर येथील भीमराव धाकलू लकेबैलकर यांच्या गोठ्यात हा प्रकार घडला आहे सदर भीमराव यांचे दोन चिरंजीव भारतीय सेनेत सेवा बजावत आहेत पण गावाकडे अशा प्रकारची घटना घडल्याने त्यांनी हळूहळू व्यक्त केला आहे.
अज्ञातानी गोमातेच्या उजव्या पायाच्या बाजूला मानेवर पोटजाळीने कुऱ्हाडीने मोठा घाव केला आहे. प्रथमदर्शनी गोमातेवर यांनी जंगली जनावराने हल्ला केला असावा असा अंदाज बाळगून वन खात्याच्या वनरक्षक राजीव पवार,कल्लाप्पा रावळ अधिकाऱ्यांनी ही पाचारण केले. परंतु गाईच्या अंगावर झालेली जखम ही कोणी जनावराने केली नसून कोणीतरी जाणीवपूर्वक कुऱ्हाडीने केला असल्याचे तपासांती निदर्शनाला आले. यासंदर्भात करंजाळ गावातही पंच कमिटीची बैठक घेऊन अशा अज्ञात व्यक्तीचा निषेध नोंदवण्यात आला. सदर गाईच्या मानेजवळ मोठी जखम झाल्याने तातडीने नंदगड येथील शिव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चरणतीमठ यांना बोलावून गोमातेवर उपचार हाती घेण्यात आले आहेत. पण अशा कु प्रवृत्तीच्या माणसा विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.