लोकोळी, जैनकोप येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवीचा यात्रा उत्सव गेल्या सात दिवसापासून जल्लोषात साजरा करण्यात येत आहेत. आज मंगळवारी देवीचा नावे ‘अंबली गाडे’ फिरवण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी गावातून जल्लोषी संवाद्य मिरवणूक झाली. यामध्ये आबालवृध्द सह महिलांनीही मोठ्या संख्येने व उत्साहाने भाग घेतला होता. रात्री उशिरापर्यंत गाडे फिरवण्याचा कार्यक्रम पार पडला.
श्री ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा गेल्या सात दिवसापासून मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. दररोज रात्री विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून या उत्सवात उधाण आणण्यात आले आहे. रविवारी झालेल्या महालक्ष्मी देवीचा यात्रा उत्सव हा अविस्मरणीय ठरला. सर्वत्र चक्काजाम वातावरण निर्माण झाले होते. रविवारी दिवसभरात जवळपास दोन लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. सोमवारी थोडीफार विरळ गर्दी दिसली तरी मंगळवारपासून पुन्हा देवीच्या दर्शनासाठी गर्दी वाढली आहे.
परंपरेनुसार महालक्ष्मी यात्रेत अंबली गाडे फिरवण्याची परंपरा ही फार जुनी आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या विवाह सोहळ्यानंतर महिषासुर च्या नावे रेडा मारण्याची प्रथा आहे. त्यानंतर देवीच्या नावे ओठ्या भरणी कार्यक्रम होतो. तदनंतर देवीच्या रागाला शांत करण्यासाठी घरोघरी आंबील बनवली जाते. बैलगाडी जुंपून त्यामध्ये आंबील भांडे ठेवून घरोघरी जमा करून ते देवीला अर्पण करण्याची परंपरा जुनी आहे. यानुसार लोकोळी जैन कोप या दोन्ही गावांमध्ये मंगळवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला रितीरिवाजाप्रमाणे व हाकदार प्रतेप्रमाणे यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. गावात एकच जल्लोषी वातावरण निर्माण झाले होते.
उद्या बुधवारी यात्रोत्सवाची सांगता
गेल्या आठ दिवसापासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या श्री महालक्ष्मी यात्रेस्तवाची बुधवार दि. 15 रोजी सांगता होणार आहे. त्यामुळे मंगळवारपासून पुन्हा गर्दी झाली आहे.बुधवारी दिवसभर यात्रेला उधान येणार असून सायंकाळी चार वाजता देवी गदगे वरून उठून ती सीमेकडे प्रयाण होणार आहे. त्यानंतर या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.