2026_04_24_20_26_49_276

खानापूर:लाईव्ह न्यूज / प्रतिनिधी :
येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम हायस्कूलने एस.एस.एल.सी. परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले असून शाळेचा निकाल ९९% लागला आहे. या यशाबद्दल शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ नुकताच पार पडला.

वीरेश फुटाणे आणि प्रिती कोलेकर शाळेत प्रथम:
विद्यार्थ्यांमध्ये कुमार वीरेश व्ही. फुटाणे आणि कुमारी प्रिती एम. कोलेकर यांनी प्रत्येकी ९६.४८% गुण मिळवून शाळेत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्यासह इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

विनामुल्य शिक्षणाची मोठी घोषणा:
संस्थेचे चेअरमन श्री चेतन अरुण मणेरीकर यांनी यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयात कोणत्याही शाखेत (Commerce/Science/Arts) विनामुल्य शिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केली.

नियोजनबद्ध प्रयत्नांचे फळ:
चेअरमन श्री मणेरीकर यांनी या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य श्री विनोद मराठे आणि सर्व शिक्षकवृंदाच्या नियोजनबद्ध परिश्रमाला दिले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे कार्यदर्शी श्री सुहास कुलकर्णी, माजी अध्यक्ष श्री मदन देशपांडे, संचालक श्री विकास वर्दे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पी.के. चापगांवकर उपस्थित होते.

शाळेच्या या उत्तुंग यशामुळे खानापूर परिसरातून विवेकानंद शिक्षण संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Vivekananda English Medium High School SSLC. Result 99%; Pride of meritorious students

Khanapur:
Sri Swami Vivekananda English Medium High School here SSLC. He has achieved brilliant success in the examination and the result of the school is 99%. A special felicitation ceremony for meritorious students of the school was recently held for this achievement.

Viresh Futane and Priti Kolekar first in school:
Kumar Viresh V among the students. Phutane and Kumari Priti M. Kolekar secured 96.48% marks each and stood joint first in the school. The remarkable achievement of him and all other meritorious students is appreciated at all levels.

Big Announcement of Free Education:
The Chairman of the Institute Mr. Chetan Arun Manerikar welcomed all the successful students and wished them all the best for their future endeavors. Also, he made an important announcement on this occasion to provide free education in any branch (Commerce/Science/Arts) in Swami Vivekananda Undergraduate College to the first time students.

Fruit of planned efforts:
Chairman Mr. Manerikar attributed this success to the planned hard work of the school principal Mr. Vinod Marathe and all the teaching staff. On the platform of the program Mr. Suhas Kulkarni, former President Mr. Madan Deshpande, Director Mr. Vikas Varde and Principal of the College Mr. P.K. Chapgaonkar was present.

Due to the great success of the school, congratulations are being showered on the Vivekananda Educational Institute from Khanapur area.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us