file_0000000005e082089f88c55a82c7f0cd

पुणे : हेब्बाळ येथील केसरकर दाम्पत्याच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी **बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन (BPL Foundation)**च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 193 हून अधिक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करत सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांची देणगी जमा झाली आहे.

केसरकर कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या मुलांच्या भवितव्याला आधार मिळावा, या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. जमा झालेला निधी लवकरच पीडित कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार असून, विशेषतः मोहन केसरकर यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी या निधीचा उपयोग करण्याचा फाउंडेशनचा मानस आहे या संदर्भात बीपीएल फाउंडेशनच्या इतर सर्व सभासदांना विश्वासात घेऊन या निधी संदर्भात व आगामी काळात अधिकाधिक निधी जमवण्यासंदर्भात आपले निर्णय पारदर्शक राहतील असे बीपीएल फाउंडेशनचे केदार शिवणगेकर यांनी खानापूर लाईव्ह बोलताना सांगितले.

या मदत उपक्रमाला आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच दानशूर व्यक्तींशी फाउंडेशनच्या वतीने संपर्क साधून पाठपुरावा सुरू आहे. अधिकाधिक निधी संकलित करून पीडित कुटुंबाला दीर्घकालीन आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील केसरकर दाम्पत्याला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मोहन केसरकर यांच्या मुलगा व मुलीच्या शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून समाजातील संवेदनशीलता आणि माणुसकीचा प्रत्यय येत असून, अजूनही मदतीसाठी इच्छुक दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

— खानापूर लाईव्ह

Do Share
error: Content is protected !!
Call Us