खानापूर : तोपिनकट्टी महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी संचलित शांतिनिकेतन पब्लिक (सीबीएससी) शाळेचा दहावीचा निकाल यावर्षीही 100 टक्के लागला आहे. या शाळेतून 111 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये कु. वैष्णवी देसाई या विद्यार्थिनीने 89.6 टक्के गुण घेऊन शाळेत पहिला आली आहे. त्याचप्रमाणे अनुक्रमे कु. देवयानी शिंदे या विद्यार्थिनीने 87.6%, कु. अथर्व देसाई 85.4%, कु. अर्पिता चव्हाण 84.6% कु. स्नेहा बुधनुर 84.2%, कु. अहमद आयान 83% , कु. प्रीती चलवादी 78.4%, कु. प्राप्ती साखळकर 78%, कु. संचिता निलजकर 77.8%, कु. सिद्धीका बनसोडे 77.4% या विद्यार्थ्यांनी उच्चांक साधला आहे. याशिवाय प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी मध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शांतीनिकेतन पब्लिक शाळेने गेल्या दहा वर्षापासून या शाळेचा शंभर टक्के निकाल राखला आहे. यावर्षीही शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शाळेचे प्राचार्य, शिक्षक वर्गाचे श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक श्री विठ्ठल हलगेकर यांनी अभिनंदन केले आहे.