file_0000000033c482119d5824da4e3f5e9b

रेशनधारकांनी लवकरात लवकर रेशन घेऊन जावे; ई-केवायसीसाठी संपूर्ण सप्टेंबर महिना संधी

खानापूर : तालुक्यातील लोंढा गावातील रेशन दुकानात गेल्या ऑगस्ट महिन्यात रेशन वाटपावेळी मोठी गर्दी झाली होती. 30 ऑगस्ट 2026 रोजी गॅरेंटी योजना अध्यक्ष या नात्याने रेशन दुकानाला भेट दिली असता, सर्व्हरच्या अडचणीमुळे आणि वेळेवर अंगठ्याचे नमुने न लागल्याने रेशनधारकांना ताटकळत राहावे लागत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी रेशन दुकानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

या परिस्थितीची दखल घेत रेशन दुकानदारांना 30 व 31 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवून रेशनधारकांना सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दुकानदारांनी रात्री उशिरापर्यंत रेशन वाटप करून रेशनधारकांना सहकार्य केले.

त्यावेळी पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्याचे रेशन 10 तारखेच्या आसपास वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आजपासून लोंढा रेशन दुकानाच्या कार्यक्षेत्रातील रेशनधारकांनी आपले रेशन घेण्यासाठी दुकानात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोंढा रेशन दुकानाच्या कार्यक्षेत्रातील गावे : राजवाळ, आस्तोली, अक्राळी, वरकड, दूधवाळ, मोहिशत, वाट्रा, मुंढवाड, माचाळी, सातनाळी, मांजरपै, वरकडपाटे, पिंपळे, घार्ली व इतर गावे.

ई-केवायसीसाठी संपूर्ण सप्टेंबर महिना संधी

ज्या रेशनधारकांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांनीही काळजी करू नये. सप्टेंबर महिनाभर ई-केवायसी प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व रेशनधारकांनी याची नोंद घ्यावी.

रेशनधारकांनी अजून शेवटची तारीख आहे, असे समजून शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नये. शेवटच्या दिवसांत होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर रेशन घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेशनधारकांच्या समस्यांची दखल घेतली जाईल

रेशन वाटपाबाबत कोणतीही अडचण, सर्व्हरची समस्या, अंगठ्याचे नमुने न लागणे किंवा इतर कोणताही त्रास होत असल्यास आम्हाला कळवावा. संबंधित समस्यांची दखल घेण्यात येईल.

तसेच रेशनधारकांनी आपल्या अडचणींसाठी गॅरेंटी योजना कार्यालय किंवा अध्यक्ष व सदस्य, गॅरेंटी योजना कमिटी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us