Screenshot_2026-08-27-14-04-29-76_21988050ec06b2a70877acc6d4501398

*

मोर्चातील प्रमुख मागण्या:

जिहादी प्रवृत्तीच्या त्या जीहाद्याला फाशी द्या, किंवा भर चौकात एन्काऊंटर करा, केसरीकरांच्या मुला मुलीला महाराष्ट्र सरकारने पालक पालकत्व द्या.* केसरकर कुटुंबाच्या सांगलीतील त्या घरावरील संपूर्ण कर्ज माफ करा. त्या जीहाद्याचे घर आलेला कडून ती जमीन त्या कुटुंबाला सुपूर्द करा.

oplus_0

खानापूर : सांगली-कुपवाड येथे १५ ऑगस्ट रोजी हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मनीषा केसरकर व मोहन केसरकर यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटनांच्या वतीने गुरुवारी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

खानापुरातील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप युवा नेते पंडित ओगले, जोतिबा रेमानी, सुरेश देसाई, संजय कुबल, प्रमोद कोचेरी, चेतन मनेरीकर, धनश्री सरदेसाई, सुनीता पाटील, महाबळेश्वर पाटील,चेतन मणेरीकर,सयाजी पाटील, मल्लाप्पा मारीहाळ, बसवराज सानिकोप यांच्यासह विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था, बजरंग दल, श्रीराम सेना, भाजप तसेच विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केसरकरांच्या मुलांचे पालकत्व महाराष्ट्राने स्वीकारावे

या घटनेमुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या केसरकर कुटुंबातील मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मुलांच्या शिक्षणासह संपूर्ण भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चादरम्यान अनेक दानशूर व्यक्ती व संघटनांनी पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली. त्याचप्रमाणे माजी आमदार अरविंद पाटील यांनी 51 हजार रुपये, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेहमानी 21 हजार रुपये, अधिवक्ते चेतन मनेरेकर, 11000 रुपये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी 11000 रुपये, प्रशांत लक्केबैलकर 11000 रुपये यासह भाजप युवा नेते पंडित ओगले, बाबुराव देसाई, सुनीता पाटील, संजय कुबल, महाबळेश्वर पाटील, मल्लाप्पा मारीहाळ, प्रल्हाद पाटील, धनश्री सर देसाई, कृष्णा गुरव, सयाजी पाटील अनेकांनी प्रत्येकी पाच हजार रुपये अशा भरीव देणग्या यावेळी जाहीर केल्या.

दरम्यान, मोहन केसरकर यांची कन्या मनाली व मुलगा मोर्चास्थळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे सांत्वन करून कुटुंबीयांना धीर दिला.

ग्रेड-२ तहसीलदार तंगोळी यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या निषेध मोर्चात पाचशेहून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते. हत्याकांडातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेपर्यंत तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

न्यायासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; खानापुरातून शिष्टमंडळाची घोषणा!

खानापूर : सांगली-कुपवाड येथील क्रूर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मनीषा व मोहन केसरकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी खानापुरातून विशेष शिष्टमंडळाची रचना करण्यात येणार आहे. हे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार असल्याची घोषणा युवा नेते पंडित ओगले यांनी खानापुरातील निषेध मोर्चादरम्यान केली.

केसरकर दाम्पत्याच्या निधनामुळे त्यांच्या मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या शिक्षणाची आणि भविष्यातील सुरक्षिततेची जबाबदारी शासनाने घ्यावी, तसेच पीडित कुटुंबाला आवश्यक ती सर्व शासकीय मदत मिळावी, अशा विविध मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येणार आहेत.

दरम्यान, केसरकर कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना मदत करावयाची आहे त्यांनी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे किंवा खालील बँक खात्यावर थेट रक्कम जमा करावी.

Oplus_19006496

मदतीसाठी बँक खाते तपशील

खाते नाव : MANALI MOHAN KESAREKAR
खाते क्रमांक : 375402010485050
IFSC Code : UBIN0537543
बँक : Union Bank of India
शाखा : Nandgad

क्यूआर कोडद्वारे केलेली मदत थेट वरील खात्यावर जमा होणार असल्याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपली छोटीशी मदत या मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मोठा आधार ठरू शकते.

Do Share
error: Content is protected !!
Call Us