Screenshot_2026-08-06-19-30-26-75_21988050ec06b2a70877acc6d4501398

0 एप्रिल १९२५ रोजी झाली होती शाळेची स्थापना; आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन दिले निवेदन

खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा येथील सरकारी हायर प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय माजी विद्यार्थी संघटनेने घेतला आहे. यानिमित्ताने माजी विद्यार्थी संघटनेची प्राथमिक बैठक पार पडली असून, महोत्सवाच्या नियोजनासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

१ एप्रिल १९२५ रोजी या शाळेची स्थापना झाली होती. गेल्या १०० वर्षांच्या कालावधीत या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना घडविले असून, अनेक माजी विद्यार्थी आज विविध शासकीय, प्रशासकीय, शैक्षणिक तसेच इतर उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे शाळेचा शताब्दी महोत्सव हा ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शताब्दी महोत्सव आयोजित करण्याचा विचार असून, त्यासाठी लवकरच सर्व माजी विद्यार्थ्यांची व्यापक बैठक घेऊन विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंतांचा गौरव आणि शाळेच्या विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे.

आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत शाळेच्या शताब्दी महोत्सवासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते :

शेखर केशव पाटील, रणजीत मल्लू पाटील, राहुल आळवणी, गणपती पाटील, मारुती रुद्राप्पा राऊळ, संजय पाटील, रणजीत पवार, सातेरी गोविंद पाटील तसेच अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते

कारलगा गावची महालक्ष्मी यात्रा येत्या फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे. त्याचीही जय्यत तयारी सुरू असून तत्पूर्वी शाळेचा शताब्दी महोत्सव याच उत्साहात कार्यक्रम करून यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच माजी विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेऊन कार्यक्रमाचे नियोजन हाती घेतले जाईल असे माजी विद्यार्थी यांनी सुचित केले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us