Screenshot_2025-06-04-16-41-06-69_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर येथील DCC बँकेच्या व्यवस्थापकसह कर्मचाऱ्यांनी गांधीनगर येथील प्राथमिक कृषी पतीन सहकारी संस्थेच्या खात्यावरील शेअर रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेला भरण्यासाठी धनादेश भरण्याची विनंती केली असता येथील बँक व्यवस्थापकानी डी.डी भरण्यास नकार दिल्याचा आरोप करत बँकेच्या व्यवस्थापकासह एका कर्मचाऱ्यावर खानापूर पोलीस ठाण्यात एफ आय आर झाली आहे.

याबाबत माहिती की, खानापूर हलकर्णी गांधीनगर या ठिकाणी नव्याने एक प्राथमिक कृषी पतीने सहकारी संस्था स्थापन करण्यात आले आहे या संस्थेच्या बँकेतील करंट खात्यावर रक्कम शिल्लक आहे. त्या रकमेतून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेला 27.500 हजार रुपये डीडी भरण्यासाठी आपण बँकेत गेलो असता येथील बँकेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी सदर डी.डी भरून घेण्यास नकार केला. अधिक विनंती केली असता. आम्हालाच अरेरवी करत तुम्ही काय करता ते करा.. मी तुमची डीडी जिल्हा बँकेला भरून देणार नाही अशी मुजरेगिरी केल्याची तक्रार गांधीनगर कृषी पतीन सोसायटीचे चेअरमन सुरेश दंडगल यांनी केली आहे. त्यामुळे बँकेतील व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांच्या या मनमानी विरोधात त्यांनी खानापूर पोलीस ठाण्यात बँकेचे व्यवस्थापक सुरेश कांबळे व कुरेर यांच्या विरोधात फिर्याद दाखल केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलम अंतर्गत एफ आय आर दाखल झाली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us