इमारत बांधकामात 1200 करोड खर्च ; अत्याधुनिक सुविधा
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. ही नवीन इमारत देशातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. नवीन संसद भवनात राज्यसभा आणि लोकसभेसोबतच एक संविधान सभागृहही बांधण्यात आले आहे. त्यात देशाच्या संविधानिक वारशाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
नवीन इमारतीतील लोकसभेत ८८८ खासदारांची बसण्याची क्षमता असेल. तर राज्यसभेचा आकार लोकसभेपेक्षा लहान असेल. राज्यसभेत ३८४ खासदार बसू शकतील. दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. यामध्ये १२८० खासदार एकत्र बसू शकतील. नवीन इमारतीत खासदारांच्या सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. संसद भवनाच्या बांधकामादरम्यान वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. यात सर्व संसद सदस्यांसाठी एक विशेष विश्रामगृह, एक लायब्ररी, जेवणाचे हॉल आणि पार्किंगची जागा आहे. हायटेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन संसद भवनात महत्त्वाच्या कामांसाठी स्वतंत्र कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
कॅफे, डायनिंग एरिया, कमिटी मीटिंग रूममध्येही हायटेक उपकरणे बसवण्यात आली आहेत. कॉमन रूम व्यतिरिक्त महिलांसाठी लाउंज, व्हीआयपी लाउंजचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष विश्रामगृहांमध्ये खासदारांना त्यांचे सहकारी, कुटुंबातील सदस्य आणि संसदेत भेटायला येणाऱ्या लोकांना बोलावण्याचे स्वातंत्र्य असेल.
जुन्या इमारतीच्या तुलनेत नव्या इमारतीतील लोकसभा आणि राज्यसभेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था सुधारण्यात आली आहे. जुन्या सभागृहांमध्ये खासदारांना बसण्यात सर्वाधिक त्रास होत असे. पण नवीन संसद भवनाच्या दोन्ही सभागृहात जागा वाढवण्यात आली आहे. आता लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात प्रत्येक बेंचवर फक्त दोन सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. जुन्या इमारतीत खासदारांना ये-जा करताना त्रास व्हायचा. मात्र नव्या सभागृहात खासदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय ये-जा करता येणार आहे. या दरम्यान कोणालाही कोणतीही अडचण येणार नाही.
नवीन संसद भवन हायटेक बनवण्याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले आहे. खासदारांच्या सुविधा लक्षात घेऊन प्रत्येक आसनावर डिजिटल यंत्रणा आणि टच स्क्रीन बसवण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या मोबाईल किंवा टॅबलेटवरून ही डिजिटल प्रणाली थेट जोडता येणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे ही यंत्रणा त्याच सीटशी जोडली जाणार आहे, जी त्यांना लोकसभा सचिवालयाने अधिकृतपणे दिली आहे. या डिजिटल प्रणालींवर संसदेच्या कामकाजाच्या तपशिलासोबतच खासदारांना त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही पाहता येणार आहेत. संसदेला कागदावर सुसज्ज करण्याचे कामही केले जात आहे. त्यामळे खासदारांना आता या यंत्रणांद्वारेच महत्त्वाची कामे कागदावर सुसज्ज करण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे खासदारांना आता या यंत्रणांद्वारेच महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे.
नवीन संसद भवन संकुलात अद्ययावत दृकश्राव्य यंत्रणाही बसवण्यात आली आहे. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी आणि अधिवेशन तहकूब झाल्यानंतर खासदार आणि कर्मचाऱ्यांनाही त्यांच्यामार्फत माहिती दिली जाईल. जुन्या इमारतीप्रमाणेच इमारतीत खासदारांसाठी आरामदायी डायनिंग हॉल तयार करण्यात आला आहे. याशिवाय वयोवृद्ध खासदारांसाठी अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.