- बेळगांव, तारीख 06 डिसेंबर : शिक्षक हा अध्यापन-अध्ययन प्रक्रियेतील आधारस्तंभ असतो. सध्याच्या संदर्भात, शिक्षक हा केवळ ज्ञानाचा प्रसार करणारा नसून तो विविध भूमिका बजावतो. शिक्षकांचे कार्य विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांना अध्ययनात मदत करणे आणि विद्यार्थी प्रभावीपणे शिकू शकतील व शिकतील अशी परिस्थिती निर्माण करणे हे आहे.
- शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्याप्नात त्याचा वापर केला तर विद्यार्थ्यांच्या जीवनात नवी दिशा देणारी ठरू शकते. असे विचार कर्नाटक राज सेकंडरी एज्युकेशन विभागाचे संचालक के एस करीचन्नावार यांनी व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन दिनाच्या निमित्ताने बेळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते
- यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले, शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो. जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते. डॉ. राधाकृष्णन उत्कृष्ट शिक्षकाची व्याख्या करतात ‘शिक्षकाने कमीतकमी शिकवून विदयार्थी स्वतः अधिकाधिक शिकेल यासाठी त्याला प्रशिक्षित केले पाहिजे. सुप्रसिद्ध तत्ववेत्ता जॉर्ज बर्नार्ड शॉ याने एके ठिकाणी म्हटले आहे की, मुलांची स्वतः शिकण्याची इच्छा शिक्षकांनी मारू नये. उलट त्यांना स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी प्रेरित करावे अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात जडणघडणीमध्ये शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. शिक्षक हा समाजाचा मुख्य घटक असून सुदृढ समाज बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे योगदान देत असतो. शिक्षकाने स्वतःला वेळोवेळी ज्ञानाने ताजे तवाने ठेवायला व वेळोवेळी ज्ञानाने परिपक्व असायलाही हवे; कारण विद्यार्थ्यांच्या जीवनाला आणि समाजाला दिशा देणारे कार्य ते करत असतात अतिशय प्रामाणिक निस्वार्थ भावनेने एक सुसंस्कारित नैतिक मूल्य आणि विचार दृष्टी देशभक्ती ची रुजवण बालवयातच करायला हवी ते कार्य शिक्षकांनी प्रामाणिकपणे अत्यंत प्रामाणिक पणे करायला हवे. स्वतःला झोकून देऊन शिक्षकांनी कार्य करायला हवे. जास्तीत जास्त मुलांच्या हृदयाच्या जवळ जाऊन त्यांचा वेध घ्यायला हवा. शिक्षकाची नोकरी ही सर्वांनाच भेटत नाही ; त्यामध्ये तुम्ही भाग्यवान आहात. शिक्षक समाजाची सेवा करण्याची काही क्वचितच व्यक्तींना शिक्षकांची नोकरी मिळते याचे भाग्य तुमच्या मध्ये आहे तुम्ही शिक्षक झालात ते अत्यंत प्रामाणिकपणे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे; अतिशय प्रामाणिकपणे कार्य करून समाज परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे ती चांगल्या पद्धतीने पार पडण्याचे ध्येय उराशी बाळगून कार्य करावे. आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रात शिक्षकाची महत्वाची भूमिका आणि जबाबदारी व कार्य “ याविषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त विशेष व्याख्यान आणि नूतन शिक्षकांच्या नियुक्ती पत्रकांचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
- व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत विषय पर्यवेक्षक एन. आर. पाटील , कवी प्राध्यापक निलेश शिंदे, सतिष दुरदुंडीमठ, के. एम. मंजुनाथ, आर. एस. वालीशट्टी, नारायण पाटील, सिद्धाप्पा गावडे, सुनिल पाटील, व्हीं. एम. नाईक, नामदेव वड्डेबैलकर , सतिश पाटील, गजानन लोहार, प्रतिभा कम्मार व्यासपीठावरती उपस्थित होते. स्वागत प्रा. मयूर नागेनट्टी यांनी केले. प्रास्ताविक कवी प्राध्यापक निलेश शिंदे यांनी केले. परिचय विषय पर्यवेक्षक श्री एन आर पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन मोहन भित्तेवाडकर यांनी केले. आभार शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष आप्पाजी गाडेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख उपस्थितीत गावडू पाटील, मनोहर पाटील, कल्पना पाटील, सागर गुंजिकर, यल्लाप्पा पाटील, चेतन हिरापाचे, भरामा पाटील, अक्षय बेळगावकर, बसवंत पाटील, किरण सूर्यपान, रवींद्र चलवेटकर सुधीर लोहार, सुरज पिसाळे, राजू चींदी तसेच विविध भागातील शिक्षक विद्यार्थी पालक शिक्षणाधिकारी पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.