Oplus_19006464

Oplus_19006464


चापगाव | वार्ताहर
नागरगाळी-कटकोळ या मुख्य मार्गावरील शिवोली ते चापगाव दरम्यानच्या एक किलोमीटर रस्त्याचा वनवास आता संपणार आहे. मंजूर निधीतून रखडलेले हे काम येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित कंत्राटदाराने दिले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कंत्राटदाराला दिलेल्या सक्त तंबीनंतर या कामाला गती मिळाली आहे.
ग्रामपंचायतीचा पाठपुरावा


या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पत्रकार पिराजी कुराडे यांनी गेल्या आठवड्यात आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच चापगाव ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी, पीडीओ (PDO) आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनेही संबंधित विभागाला निवेदन देऊन काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.


आमदारांचे कडक निर्देश


ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार हलगेकर यांनी कंत्राटदाराला पाचारण करून आठवड्याभरात काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक पवित्र्यानंतर कंत्राटदाराने तात्काळ हालचाली सुरू केल्या असून, ‘खानापूर लाईव्ह’शी बोलताना कामाच्या पूर्ततेची ग्वाही दिली आहे.
या निर्णयामुळे चापगाव परिसरातील वाहनधारक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us