Oplus_16777216

Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

कधी एखादे रस्त्यावरील पडलेली वस्तू किंवा पैशाची बॅग किंवा दागिने मोबाईल सापडले तर परत देणे दुर्मिळ ठरते. त्यामुळे हरवलेल्या वस्तू आपल्याला परत मिळतील की नाही याची शाशंकता नसतेच. पण अशांमध्ये काही क्वचित प्रामाणिक माणसे समाजामध्ये भेटतात. ती प्रामाणिक असतात. अशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील करंबळचे खानापूर तालुका सिव्हिल इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष व लैला साखर कारखान्यातील निवृत्त अभियंते राजेंद्र कुलम यांचा किमती मोबाईल दुचाकीवरून येताना रस्त्यावर पडला होता. ते त्यांच्या लक्षात आलेच नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली, पण त्यांना मोबाईल सापडला नव्हता. सदर मोबाईल एका बस चालकाला मिळाला व त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाची कस लावून राजेंद्र कुलम त्यांच्या फोनवर आलेल्या एका कॉल वरून त्यांच्या मित्राला माहिती दिली. त्यांना तो प्रामाणिकपणे मोबाईल परत केला. तालुक्यातील यडोगा येथील व सध्या खानापूर सिद्धिविनायक मराठा मंडळ शाळेच्या म्हणून काम करणारा कल्लाप्पा नागप्पा कुपटगिरी असे त्या प्रामाणिक युवकाचे नाव आहे. बस चालकाने केलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे राजेंद्र कुलम यांनी अभिनंदन केले.

Do Share
error: Content is protected !!
Call Us