तालुक्यात दोन दिवसात दोन अपघातात चार जणांचा मृत्यू! ಎರಡು ದಿನಗಳೊಳಗೆ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಎರಡು ಅಪಘಾತಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ವರು ಸಾವು!
खानापूर–लोंढा मार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार
माणिकवाडी क्रॉसजवळ दुचाकी–ट्रकची समोरासमोर धडक; सैनिक युवराज माळिक यांचा जागीच मृत्यू
खानापूर : खानापूर–लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ मंगळवारी, दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातात ठार झालेल्या मध्ये जटगा येथील सैनिक युवराज शत्रुघ्न माळिक (वय ३०, रा. जटगे, ता. खानापूर) त्यांच्या पत्नी मोहिनी युवराज माळिक (वय २५) दोघांचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज हे आपल्या दुचकीवरून आपल्या पत्नीसह खानापूरला आले होते. युवराज मळीक हा चार दिवसांपूर्वी भारतीय सेनेतून सुट्टीवर आला होता. मंगळवारी रात्री ते पत्नी मोहिनी यांच्यासोबत दुचाकीवरून खानापूरहून आपल्या जटगे गावाकडे जात होते. माणिकवाडी क्रॉसजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या ( kA22-AA9666) या अवजड वाहू ट्रकची जोरात धडक झाली. यामध्ये युवराज हे जागीच पाय तुटून रक्तबंबाळ झाल्याने ते जागीच ठार झाले , तर त्यांच्या पत्नी मोहिनी माळिक या गंभीर जखमी झाल्या होत्या. तातडीने त्यांना अधिक उपचारासाठी खानापूरला आणून बेळगावला पाठवत असतानाच खानापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांचाही मृत्यू झाला
अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे पीआय एल. एच. गवंडी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी मोहिनी माळिक यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान माजी आमदार अरविंद पाटील यांनी दवाखान्यात जाऊन दोन्ही मृतदेहावर सोपस्कार प्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना सूचना दिल्या. यावेळी प्राध्यापक शंकर गावडा, अनंत झुंजवाडकर, अमोल बेळगावकर, पंकज कुट्रे यांनीही अपघात घटनास्थळापासून दवाखान्यापर्यंत मृतदेह व जखमीना पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
दरम्यान, युवराज माळिक व त्यांच्या पत्नी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे जटगे गावावर शोककळा पसरली असून, माळिक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन दिवसात चार जणांचा अपघाती मृत्यू!
ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर खानापूर तालुक्यात दुःखद घटना घडली आहे. काल सोमवारी तोपीनकट्टी रस्त्यावर लक्केबैल येथील बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा माणिकवाडी जवळ पती-पत्नींचा अपघाती मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ಖಾನಾಪುರ: ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 8 ರ ಮಂಗಳವಾರ ರಾತ್ರಿ ಖಾನಾಪುರ-ಲೋಂಡಾ ರಸ್ತೆಯ ಮಾಣಿಕ್ವಾಡಿ ಕ್ರಾಸ್ ಬಳಿ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಮತ್ತು ಟ್ರಕ್ ನಡುವೆ ಸಂಭವಿಸಿದ ಭೀಕರ ಡಿಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಪತಿ ಮತ್ತು ಪತ್ನಿ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ. ಮೃತರನ್ನು ತಾಲೂಕಾ ಖಾನಾಪುರದ ಜಟ್ಗೆಯ ಯುವರಾಜ್ ಶತ್ರುಘ್ನ ಮಲಿಕ್ (30, ಸೈನಿಕ) ಮತ್ತು ಅವರ ಪತ್ನಿ ಮೋಹಿನಿ ಯುವರಾಜ್ ಮಲಿಕ್ (25) ಎಂದು ಗುರುತಿಸಲಾಗಿದೆ.
ಅಪಘಾತದ ಸುದ್ದಿ ತಿಳಿದ ಕೂಡಲೇ ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಪಿಐ ಎಲ್.ಎಚ್. ಗೋವಂಡಿ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಧಾವಿಸಿದರು. ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದ ಮೋಹಿನಿ ಮಲಿಕ್ ಅವರನ್ನು ತಕ್ಷಣ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಿಸಲಾಯಿತು; ಆದಾಗ್ಯೂ, ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ ಅವರು ನಿಧನರಾದರು ಎಂದು ವರದಿಗಳು ಸೂಚಿಸುತ್ತವೆ. ಏತನ್ಮಧ್ಯೆ, ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಅರವಿಂದ್ ಪಾಟೀಲ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೃತರಿಗೆ ಅಗತ್ಯವಾದ ವಿಧಿವಿಧಾನಗಳ ಬಗ್ಗೆ ವೈದ್ಯರಿಗೆ ಸೂಚನೆ ನೀಡಿದರು. ಪ್ರೊಫೆಸರ್ ಶಂಕರ್ ಗಾವ್ಡಾ, ಅನಂತ್ ಝುಂಜ್ವಾಡ್ಕರ್, ಅಮೋಲ್ ಬೆಲ್ಗಾಂವ್ಕರ್ ಮತ್ತು ಪಂಕಜ್ ಕುಟ್ರೆ ಕೂಡ ಮೃತದೇಹಗಳನ್ನು ಮತ್ತು ಗಾಯಾಳುಗಳನ್ನು ಅಪಘಾತ ಸ್ಥಳದಿಂದ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸಾಗಿಸಲು ಅವಿಶ್ರಾಂತವಾಗಿ ಶ್ರಮಿಸಿದರು, ಆದರೆ ಅವರ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಅಂತಿಮವಾಗಿ ವಿಫಲವಾದವು.