Home » गोवा: करंबळचा युवक गोव्यात ठार ! भरधाव कारची दुचाकीला धडक !

गोवा: करंबळचा युवक गोव्यात ठार ! भरधाव कारची दुचाकीला धडक !

IMG-20241009-WA0046

खानापूर /प्रतिनिधी :

गोव्यातील तिस्का येथे कामानिमित्त वास्तवात असलेल्या खानापूर तालुक्यातील करंबळ येथील एका युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव प्रशांत नागेश घाडी वय 25 असे आहे. याबाबत मिळालेली माहिती की, प्रशांत घाडी हे गोवा येथील प एमआरएफ टायर कंपनीमध्ये कामाला होते. ते गोव्यात वास्तवात होते. आपल्या दुचाकी वरून काम संपवून मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घराकडे येत असताना तीस्का जवळ भरघाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरात ठोकल्याने जखमी अवस्थेत त्यांना बांबोली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्याच्यावर उपचार झाला नसल्याने त्यांचा रात्री बारा वाजता मृत्यू झाला.

अपघाताचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झालेला प्रसंग..

तिस्का या घटनेचा पंचनामा केला आहे आज दुपारी प्रशांतचा मृतदेह करंबळ येथे आणण्यात आला. बुधवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. करंबळ येथील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष देवानंद घाडी यांच्या चुलत भाऊचे मुलगे होत. या अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर, तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, यांच्यासह मित्रपरिवार अंत्य संस्कारासाठी उपस्थित होता. त्याच्या आकस्मित जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पक्षात आई-वडील, भाऊ, आजी असा परिवार आहे

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us