IMG-20230611-WA0011

खानापूर: कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आलेल्या स्त्री शक्ती योजने अंतर्गत मोफत बससेवा योजनेचा शुभारंभ जिल्हा व तालुका स्तरावर रविवारी करण्यात आला. खानापूर बस आगारांतर्गत मोफत स्त्रीशक्ती योजनेचा शुभारंभ खानापूरचे आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर,मेघा कुंदरगी, विनोद कलाल, रफिक वारीमनी, तोहित चांदकनवर सह तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस उपअधीक्षक रवी नाईक खानापूर पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्रमुख महेश तीरकनावर यांनी केले.

योजनेसंदर्भात बस आगाराच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. काँग्रेसच्या पाच हमी योजनेपैकी एक असलेल्या शक्ती योजनेच्या अंतर्गत रविवारपासून महिला राज्यात सामान्य परिवहन बसमधून कुठेही आणि कधीही मोफत प्रवास करू शकतात. चार महामंडळांच्या एसी बसे आणि एक्स्प्रेस बसेस वगळता सामान्य बसेसमध्ये प्रवास करू शकतात. बाहेरील राज्यांमध्ये चालणाऱ्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची परवानगी नाही. बसमधून मोफत प्रवास करताना महिलांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले निवासी ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आपल्यासोबत ठेवणे आवश्यक आहे. यासह या योजनेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून नजीकच्या सायबर सेंटरमधून किंवा सेवा सिंधू पोर्टलद्वारे नोंदणी करून स्मार्ट कार्ड मिळवता येते. यासाठी देखील आधार कार्ड किंवा कोणत्याही निवासी ओळखपत्राच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. हे स्मार्ट कार्ड सरकारतर्फे मोफत देण्यात येणार आहे.

या शक्ती योजनेचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते हिरवा निशान दाखवून करण्यात आला.

योजनेच्या लाभासाठी तालुक्यात गावागावात बसेस आवश्यक

यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, राज्य सरकारने सुरू केलेली ही शक्ती योजना महिलांना लाभदायक आहे. हे जरी खरे असले तरी खानापूर तालुक्यात पूरक बसेस नसल्याने खानापूर तालुक्यातील महिलांना याचा कितपत लाभ मिळणार? हा विचारांती प्रश्न आहे. आपण या संदर्भात कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री यांना निवेदन देऊन खानापूर तालुक्याच्या बस आगारात अतिरिक्त बसेस मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी आपण केली आहे असे त्यांनी सांगितले.

खानापूर तालुक्यात एक लाखाहून अधिक महिला घेणार लाभ!

खानापूर तालुक्याची आजची लोकसंख्या 2.80 लाख आहे. यामध्ये निम्म्या महिलांचा समावेश असून यामध्ये शालेय विद्यार्थी व महिला ंना याचा लाभ मिळणार आहे. आज खानापूर तालुक्यात जवळपास 68 बसेस कार्यान्वित आहेत. या तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहराकडे धावतात. या बसेस मधून महिलांना याचा लाभ मिळणार आहे. प्रामुख्याने शाळकरी मुलांना देखील या योजनेचा लाभ होणार असून बस मधून ज्या शाळकरी मुली प्रवास करतात. त्यांना यापूर्वी पास देण्यात येत होते, पण आता आधार कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र दाखवून महिला शालेय मुली प्रवास करू शकतात याचा तालुक्यातील जनतेला घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us