कोल्हापूर : मृग नक्षत्र आले पण मान्सून पावसाच्या पत्ता नाही. त्यामुळे यावर्षीचा पूरक पावसाळा झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करू नये असे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून येत्या 10 जूनपर्यंत कोकणात येणार असला, तरी कर्नाटक , महाराष्ट्र व्यापण्यास 25 जून उजाडणार आहे. या कालावधीत पावसाचा फारसा जोर असणार नाही. त्यामुळे 70 ते 120 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाचा जोर वाढला नाही, तर दुबार पेरण्यांची वेळ येऊ शकते. असे हवामान खात्याने म्हटले आहे.