बेंगलोर: कर्नाटक विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली निवडणुकीपूर्वी प्रदेश काँग्रेस पक्षाने चार प्रमुख गॅरंटी कार्ड देऊन मतदारांना आकर्षित केले आणि कर्नाटकात एक हाती सत्ता मिळवली कर्नाटकातील मतदारांनी काँग्रेसच्या कार्डावर ठेवलेला विश्वास ठेवला आहे. गेल्या पाच वर्षात भाजपाने केलेल्या हुकूमशाहीमुळे कर्नाटकातील जनतेने तब्बल 135 जागांवर काँग्रेस पक्षाला विजयी करून एक बलाढ्य पक्ष म्हणून दक्षिण भारतामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस प्रस्थापित केले आहे. एकीकडे भाजपाने काँग्रेस हटाव मोहीम राबवत असताना कर्नाटकातील जनतेने भाजपच हटाव असा पवित्र त्यामुळे 2023 ची निवडणूक ही लक्षवेधी ठरली.
प्रामुख्याने कर्नाटकात मागील पाच वर्षात भाजप सत्तेत येण्यासाठी झालेल्या घडामोडी आणि काँग्रेसने सावध पवित्रा घेत कर्नाटकातील जनतेला आकर्षित करण्यासाठी हळुवारपणे निवडणुकीपूर्वी दिलेली ‘ गॅरंटी कार्ड’ हेच या निवडणुकीचे फलश्रुत म्हटले तर वावगे ठरणार नाही. कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या वतीने निवडणुकीपूर्वी चार गारंटी कार्ड देऊन लोकांना आकर्षित केले. यामध्ये प्रामुख्याने गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील गृहिणीला दरमहा 2000 रुपये, अन्यभाग्य योजनेअंतर्गत प्रति व्यक्तीला 10 किलो मोफत तांदूळ, युवा निधी अंतर्गत निरोपयोगी युवकांना भत्ता देण्याची योजना त्यामध्ये प्रामुख्याने पदवीधरना 3 हजार रुपये तर डिप्लोमाधारकांना 1500 रुपये देण्याची हमी. यापेक्षाही प्रामुख्याने अत्यंत महत्त्वाची गॅरंटी कार्ड योजना म्हणजे गृहज्योती योजना होय. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला त्याचा चांगला लाभ होणार आहे. 200 युनिट पर्यंत विद्युत बिल मोफत देण्याची हमी काँग्रेस पक्षाने दिली आहे त्यामुळे 200 युनिट पर्यंतचे विद्युत बिल मीटरला येणारच नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पडणारी मोठी कात्री आता कमी होणार आहे. शिवाय महिलांना बस पास फ्री देण्याचे आश्वासनही काँग्रेस गॅरंटी वर आहे. त्यामुळे या वरील योजनांची अंमलबजावणी काँग्रेस सरकार करणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी दोन मातब्बर नेत्यांमध्ये रसिकेत सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या या गॅरंटी कार्डाबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीही खानापूरच्या सभेत अंगणवाडी महिलांच्या पगारात वाढ करण्याबरोबर अनेक आश्वासनांची खैरात केली होती. याही घोषणांची अंमलबजावणी कर्नाटक सरकार करेल का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एकूणच कर्नाटक काँग्रेस पक्षाने दिलेल्या या वरील गॅरंटीकरणामुळेच कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली असून याला बंधने न लावता सर्वसामान्य पर्यंत या योजना पोहोचतील का? याकडे मात्र सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटकाचा मुख्यमंत्री कोण? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कर्नाटकात काँग्रेस भक्कम करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष डि.के. शिवकुमार व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रयत्न कामी लागले आहेत. पण आता एकहाती सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण? याकडे लक्ष लागले आहे.