खानापूर: खानापूर विधानसभा मतदारसंघ यावेळी बहुतांशी मतदान केंद्रामध्ये चुरशीने मतदान झाले आहे. खानापूर तालुक्यात 255 मतदान केंद्रापैकी मतदान केंद्र क्र. 20 मोरब येथे तालुक्यात सर्वात उच्चांकी 93.13% मतदान झाले असून त्या पाठोपाठ मतदान केंद्र क्र. 28 उचवडे या ठिकाणी 89.64 % मतदान झाले असून सर्वात कमी लोंढा येथील मतदान केंद्र क्र. 61 वर मतदान झाले आहे.
मोरब या ठिकाणी एकूण 291 मतदान असून त्यापैकी 271 मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर उचवडे या ठिकाणी एकूण 386 मतदान आहे. यापैकी 346 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये 185 पुरुष तर 161 महिलांचा समावेश आहे. 2018 च्या निवडणुकीत उचवडे केंद्राने उच्चांक साधला होता. लोंढा येथील मतदान केंद्रावर यावेळीही सर्वात कमी मतदान झाले आहे.
त्याचप्रमाणे बेटगिरी येथील मतदान केंद्रावर 92.11 टक्के मतदान झाले असून या ठिकाणी 304 मतदारांपैकी 280 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. कुसमळी बूथ क्र. 21 मध्ये 89.24 टक्के मतदान झाले असून या ठिकाणीही 762 पैकी 680 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे सणहोसुर येथील मतदान केंद्रावर 89.13% मतदान झाले आहे. तर लोंढा येथे मतदान केंद्रापैकी पाच मतदान केंद्रावर सर्वात कमी मतदान झाले आहे. लोंढा येथील मतदान केंद्र क्र. 61 या ठिकाणी सर्वात कमी 50.14% मतदान झाले आहे. या ठिकाणी 704 मतदानापैकी केवळ 353 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्या पाठोपाठ लोंढा येथील बूथ क्र. 60 वर 51.97%, बूथ क्र. 62 वर 53.83% , बूथ क्र. 63 वर 61.71% मतदान झाले आहे. एकंदरीत लोंढ्यातील सहा मतदान केंद्रापैकी क्र. 65 वर मात्र 70.73% मतदान झाले आहे. त्याबरोबर कणकुंबी येथील मतदान केंद्र क्रमांक 4 वर 62.23% मतदान झाले आहे.
लोंढ्यात सरासरी 58% मतदान
लोंढा या ठिकाणी एकूण सहा मतदान केंद्रावर 4838 इतके मतदान आहे. पण त्यापैकी केवळ 2811 मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. लोंढा गावात सहा मतदान केंद्रावर एकूण 2284 पुरुष मतदार आहेत. त्यापैकी केवळ 1416 मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर 2452 महिला पैकी केवळ 1395 महिलांनी मतदारांचा हक्क बजावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोंढा येथील बहुतांश लोक व्यवसाय निमित्त गोवा या ठिकाणी आहेत. पण त्यांचे मतदान मात्र लोंढा येथेच आहे. बाहेरगावी असलेले मतदार या ठिकाणी येऊन मतदान करण्यासाठी त्यामुळे येथील मतदानाची टक्केवारी कायम निश्चाकी राहिली आहे.