खानापूर:
मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल खानापूर शाळेचा एस.एस.एल.सी परीक्षेचा निकाल 90% लागला.
कुमारी संचिता शरद पाटील विद्यार्थिनींने 625 पैकी 606 (96.96%) गुण मिळवून बेळगाव जिल्ह्यात मराठी विभागात दुसरा तर शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक कुमारी दिक्षा दिनेश वाळवे 589 (94.24%), तृतीय क्रमांक कुमारी सोनिया विष्णू पाटील व कुमारी सुप्रिया चांगदेव पाटील 585(93.60%), चौथा क्रमांक कुमारी दर्शना सुभाष चोपडे 584 (93.44%), पाचवा क्रमांक श्वेता राजू बेडरे 579 (92.64%) या विद्यार्थिनींनी मिळवला. एकूण विद्यार्थींनी पैकी विशेष श्रेणीमध्ये 25, प्रथम श्रेणीमध्ये 90, द्वितीय श्रेणीमध्ये 26, तृतीय श्रेणीमध्ये 3 उत्तीर्ण झाल्या. मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजू (हलगेकर) व संचालक मंडळ यांची प्रेरणा व मार्गदर्शन, संचालक शिवाजीराव एस. पाटील, परशुरामअण्णा गुरव,