ब्रिटिश मुक्त खानापूर करण्याचे आवाहन : माजी आमदार अरविंद पाटील
कालमनी; भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विठ्ठल सोमाण्णा हलगेकरणा जाहीर पाठिंबा देण्यासाठी श्री सातेरी मंदिरामध्ये पंच मंडळीसह सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
प्रारंभी मारुती चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले.
या वेळी बैठकीत बोलताना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की, कालमणीतील नागरिक कायम माझ्या सोबत राहिलेत आणि ह्या वेळेला आपण घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो व पुढे आपण सर्वांनी एकत्रित राहून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विठ्ठल सोमाण्णा हलगेकर यांना आमदार करूया व खानापूर तालुक्यातील ब्रिटिश आमदारला हद्दपार करूया, असे आवाहन त्यांनी केले.
कालमणीचे जेष्ठ नागरिक व ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष नकुल नाईक म्हणाले की, ज्या ज्या वेळी आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळुन भारतीय जनता पक्षाच्या बाजुने एकमुखी निर्णय घेतले आहे.त्या त्या वेळी भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, कै.माजी आमदार प्रल्हाद रेमाणी व माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे यांचा समावेश आहे. आणि ह्या वेळेला पण भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विठ्ठल सोमाण्णा हलगेकर यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला असुन एक बुथ एक टेबल अशी संकल्पना राबविण्यात येणार असुन कालमणीतुन 100% मतदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे नेते माजी आमदार अरविंद पाटील, तालुका अध्यक्ष संजय कुबल, गुंडु तोपिनकट्टी, सुरेश देसाई, नारायण कालमणकर तसेच पंच मंडळी, ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.