खानापूर: जळगे गावाने सीमाप्रश्नी मोठे योगदान दिले आहे. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत दिवाळीची आरती ओवाळून घेणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. या गावाने अनेक सीमासत्याग्रही या चळवळीला दिले आहेत. त्यामुळे विनाविलंब हा प्रश्न सुटावा आणि दिवाळीची आरती करून घेण्याची संधी मिळावी. यासाठी गेल्या ६७ वर्षांपासून आम्ही समितीच्या पाठीशी ठामपणे उभे असून यावेळी समितीने आमच्याच गावाचा आमदार करण्याची संधी दिल्याने १०० टक्के मतदान करू, असा निर्धार शामराव ना. पाटील यांनी व्यक्त केला.
आज शनिवारी (ता.०६) जळगे येथे प्रचारफेरी काढून घरोघरी प्रचार करण्यात आला. तसेच प्रचार सभा पार पडली. सभेत मराठीच्या संरक्षण-संवर्धनासाठी आणि सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी म.ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी गावात मुरलीधर पाटील आणि समिती नेत्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
सुरूवातीला गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी प्रत्येक घरासमोर रांगोळ्या आणि महिलांनी आरती करून मुरलीधर पाटील यांचे औक्षण केले. भगव्या पताका, टोप्या आणि फेटे परिधान करून कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे संपूर्ण गाव भगवेमय झाले होते. यावेळी झालेल्या सभेत मुरलीधर पाटील म्हणाले, आमच्या गावाने सीमाप्रश्नी आतापर्यंत बहुमोल योगदान दिलेले आहे. त्याची पोचपावती म्हणून समिती आणि तालुक्यातील मराठी भाषिकांनी उमेदवारी दिली आहे. ही आपल्यासाठी संधी असून गावकरी समितीच्या पाठीशी राहून मला विजयी करण्यात योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.
सुभाष शिवणगेकर, पुंडलिक शिवणगेकर, राजू शिवणगेकर, महादेव निकलकर, दीपक गुरव, नारायण निकलकर, अरूण शिवणगेकर, प्रमा पाटील, मल्हारी तोपिनकट्टी, नारायण निलजकर, भरमा निलजकर, विलास निलजकर, सुनिल लाड, प्रिया लाड, पुंडलिक निलजकर, नागेश गणेश पाटील, मालोजी पाटील, लक्ष्मण नद्याळकर, मनोहर नंद्याळकर, चंद्रकांत पाटील, श्रीकांत पाटील, शामराव पाटील, हुवाप्पा पाटील, श्रीकांत निंगाप्पा पाटील, शामराव ना. पाटील, सोमनाथ पाटील, गंगाराम गोरे, दीपा पाटील, नारायण क. पाटील, सहदेव निलजकर, नागेस पाटील, जयकोबा पाटील, विशाल पाटील, परशराम पाटील, सदानंद निलजकर, आकाश पाटील, वैभव पाटील, अभिषेक पाटील, विनायक नंद्याळकर, गंगाराम पाटील, सतिश पाटील, नारायण पाटील, गणपती पाटील आदी उपस्थित होते.