यडोगा, दोड्डहोसूर, लक्केबैल, लोकोळी परिसरात भाजपचा घरोघरी प्रचार
खानापूर :
विठ्ठल हलगेकर हे शांत, संयमी, सुसंस्कृत आणि साधे व्यक्तिमत्व आहे. शेतकरी व सर्वसामान्यांची अचूक नाडी त्यांना माहित आहे. सहकार, शेती, उद्योग आणि शिक्षणाच्या माध्यमातून तालुक्याच्या परिवर्तनासाठी प्रयत्नवादी आहेत. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना सेवेची संधी दिल्यास ते तालुक्याचा कायापालट
केल्याशिवाय राहणार नाहीत असे उद्गार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी काढले.
बुधवारी यडोगा (ता. खानापूर) येथे खानापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांची प्रचार फेरी व सभा उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना हलगेकर म्हणाले,आपण हाती सत्ता नसतानाही तालुक्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केले आहे. या कामाला आणखी गती येण्यासाठी हाती सत्ता असणे आवश्यक असून बदल घडवण्याचे सामर्थ्य केवळ भाजपमध्येच असल्याचे सांगितले. राज्य वन निगमचे संचालक सुरेश देसाई यांनी भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची माहिती देऊन सर्व घटकांचा समाधानकारक विकास साधण्यासाठी राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या भाजपलाच जनतेने पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. यावेळी शिवा मयेकर, रमेश हंगीरगेकर, मल्लापा अंधारे, रेणुका बेनके, परशराम मादार, संजय पाटील यांच्यासह करून कार्यकर्ते, महिला नागरिक उपस्थित होते.
दोड्डुहोसूर, लक्केबैल आणि लोकोळी परिसरात प्रचार फेरी काढून मतयाचना करण्यात आली.