Home » सिंगिनकोप येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची ग्रामस्थांची मागणी

सिंगिनकोप येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची ग्रामस्थांची मागणी

file_0000000062c88211bdcc16966bd0679c

सिंगिनकोप येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची ग्रामस्थांची मागणी

तहसीलदारांना निवेदन; स्मशानभूमी, तलाव, शाळा व क्रिकेट मैदानासाठी असलेल्या जागेचे संरक्षण करण्याची मागणी

सिंगिनकोप : खानापूर तालुक्यातील सिंगिनकोप गावच्या हद्दीतील गायरान सर्व्हे क्रमांक ४ मध्ये एकूण १०.२२ एकर जागा असून, या जागेमध्ये हिंदू स्मशानभूमी, तलाव, शाळेसाठी राखीव जागा तसेच गावातील युवक व विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट मैदान उपलब्ध आहे.

मात्र, सदर मैदान व राखीव जागेच्या काही भागांमध्ये अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या या जागेचे संरक्षण करून संबंधित अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी सिंगिनकोप ग्रामस्थ, पंच मंडळी, स्वामी विवेकानंद युवक संघ सिंगिनकोप तसेच मराठी व कन्नड शाळांच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात खानापूरचे माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. गावातील सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व्हावे, स्मशानभूमी, तलाव, शाळा आणि क्रिकेट मैदानासाठी असलेली जागा भविष्यातही गावाच्या उपयोगासाठी उपलब्ध राहावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येत अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.

यावेळी गर्लगुंजीचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यासह रामानंद पाटील, नागेश पाटील, प्रशांत कुंभार, बापूजी कुंभार, अनिरुद्ध कुंभार, परशराम पाटील, महेश पाटील, सतीश कुंभार, महादेव देसाई, अजय कुंभार, राम कुंभार, ज्ञानेश्वर तारीहाळकर, सचिन कुंभार, विशाल कुंभार, ओमकार पाटील, यल्लाप्पा कुंभार, प्रथमेश कुंभार, साहिल कुंभार, प्रेमानंद पाटील, श्याम तारीहाळकर, योगेश कुंभार, शिवानंद तिरकंनवर, नयन कुंभार, बसवराज पाटील, प्रकाश कोलकार, विठ्ठल पाटील आणि सागर कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाच्या सार्वजनिक हितासाठी असलेल्या या जागेवरील अतिक्रमण हटवून संपूर्ण जागेची मोजणी व सीमांकन करण्यात यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us