रामगुरवाडीत सोमवारी खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
रामगुरवाडीत सोमवारी खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
प्रथम क्रमांकासाठी १५ हजार १ रुपयांचे आकर्षक पारितोषिक
खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी येथे श्री गोदन गुरु भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भजन मंडळांना आयोजकांनी आवाहन केले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी १५,००१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १२,००१ रुपये, तृतीय क्रमांकासाठी १०,००१ रुपये, चौथ्या क्रमांकासाठी ९,००१ रुपये, पाचव्या क्रमांकासाठी ८,००१ रुपये, सहाव्या क्रमांकासाठी ७,००१ रुपये, सातव्या क्रमांकासाठी ६,००१ रुपये, आठव्या क्रमांकासाठी ५,००१ रुपये, नवव्या क्रमांकासाठी ४,००१ रुपये, दहाव्या क्रमांकासाठी ३,००१ रुपये आणि अकराव्या क्रमांकासाठी २,००१ रुपये अशी पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय उत्कृष्ट हार्मोनियम वादन, गायन आणि तबलावादनासाठी प्रत्येकी ५०० रुपयांचे स्वतंत्र पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
भजन परंपरेला प्रोत्साहन देणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भक्तिमय वातावरणात संगीताचा आनंद घेणे हा या आयोजनामागील उद्देश आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी १,२०१ रुपये असल्याचे पत्रिकेत नमूद आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील भजनप्रेमी, संगीतप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री गोपन्नगुरु भजनी मंडळ, पंच कमिटी व ग्रामस्थ रामगुरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
खानापूर लाईव्ह | स्थानिक बातम्या, आपल्या परिसराचा आवाज!