Home » खानापूर येथे २७ सप्टेंबरला चौथी सामुदायिक सभा व विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रम

खानापूर येथे २७ सप्टेंबरला चौथी सामुदायिक सभा व विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रम

Screenshot_2026-09-26-10-11-57-73_96b26121e545231a3c569311a54cda96

खानापूर येथे २७ सप्टेंबरला चौथी सामुदायिक सभा व विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रम

खेळाडू, आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार सन्मान

खानापूर प्रतिनिधी :
विश्वभारती कला क्रीडा संघटना, शाखा खानापूर यांच्या वतीने चौथी सामुदायिक सभा व विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिवस्मारक, खानापूर येथे होणार आहे.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांना योग्य दिशा देण्यासाठी पुणे येथील प्रमुख वक्ते श्री. गीतन गिंडे यांचे विद्यार्थी प्रबोधनपर मार्गदर्शन होणार आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

कार्यक्रमात खेळाडू सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक सन्मान तसेच उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे, तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रेरणा मिळावी, तसेच सरकारी मातृभाषेतील शाळा टिकल्या व जपल्या पाहिजेत, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला श्रीमंत राणी सरकार सौ. धनश्री कर्णसिंह सर देसाई (जांबोटीकर), श्री. आबासाहेब दळवी (राष्ट्रीय पुरस्कार), गुरुवर्य श्री. एम. जी. गाडी सर, गुरुवर्य श्री. नारायण गुरव सर, श्री. थॉमस डिसोझा, श्री. प्रकाश चव्हाण सर, श्री. धनंजय पाटील सर, श्री. दिनकर मरगाळे, श्री. पिराजी कुराडे सर, श्री. रावजी बिरजे सर, श्री. भर्माजी पाटील, श्री. राजू सिद्धाने, श्री. ज्योतिबा सुतार, श्री. पांडुरंग वरकडकर, गावडे पाटील, श्री. रमेश पाटील, श्री. धर्माजी नंदनकर, श्री. जोतिबा अंधारे, श्री. संजय कांबळे, श्री. संतोष पाटील, श्री. रवींद्र मंडलिक, श्री. राजू कोल्हापुरे, श्री. प्रशांत लकेबैलकर, श्री. जनकाप्पा पाटील, श्री. अजित पाटील, श्री. किशोर हेबाळकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

लहान विद्यार्थ्यांपासून ते पदवी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व सरकारी मातृभाषा शाळांच्या शाळा सुधार समितीचे सदस्य व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुवर्य श्री. तमन्ना पाटील करणार असून शिस्त व्यवस्था गुरुवर्य श्री. परब सर पाहणार आहेत.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विश्वभारती कला क्रीडा संघटना, शाखा खानापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन माजी सैनिक अनिल देसाई यांनी केले आहे.

खानापूर लाईव्ह | तालुक्यातील विश्वसनीय आणि वेगवान वेबसाईट

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us