Home » खानापूर : पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी लाच मागितल्याचा आरोप; आरोग्याधिकाऱ्याविरोधात लोकायुक्तांकडून कारवाई

खानापूर : पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी लाच मागितल्याचा आरोप; आरोग्याधिकाऱ्याविरोधात लोकायुक्तांकडून कारवाई

IMG_20260922_182620

खानापूर : पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी लाच मागितल्याचा आरोप; आरोग्याधिकाऱ्याविरोधात लोकायुक्तांकडून कारवाई
खानापूर लाईव्ह / प्रतिनिधी :
पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली एनओसी देण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश किवडसण्णावर यांच्याविरोधात लोकायुक्त पथकाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
खानापूर तालुक्यातील कामशिनकोप्प गावातील माजी सैनिक उदय चव्हळी यांनी पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी आवश्यक असलेली एनओसी देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली होती.
या प्रकरणाची तक्रार भाजप अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष तसेच कदंब सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे.
या प्रकरणामुळे खानापूर तालुक्यात शासकीय परवानग्या आणि एनओसी प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, आरोपांची अधिकृत चौकशी व संबंधित यंत्रणेकडून पुढील माहिती समोर आल्यानंतरच प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us