Home » तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूलचा दबदबा

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूलचा दबदबा

🏐 तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूलचा दबदबा

हॉलीबॉलमध्ये प्रथम क्रमांक; वैयक्तिक क्रीडा प्रकारातही विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

शिवठाण : श्री चांगेश्वरी शिक्षण संस्था, येळूर संचालित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण, ता. खानापूरच्या हॉलीबॉल संघाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजय मिळविला.

🏆 वैयक्तिक क्रीडा प्रकारातही यश

विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारांतही दमदार कामगिरी केली.

  • १०० मीटर रिले – प्रथम क्रमांक : वैभवी पाटील, पवित्रा परीट, नम्रता पाटील, दिपाली शिरोडकर
  • उंच उडी – प्रथम क्रमांक : नम्रता पाटील
  • लांब उडी – प्रथम क्रमांक : दिपाली शिरोडकर
  • तिहेरी उडी – द्वितीय क्रमांक : नम्रता पाटील
  • तिहेरी उडी – तृतीय क्रमांक : वैभवी पाटील

या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पी. टी. चोपडे, संघ व्यवस्थापक श्री. एन. व्ही. नाईकश्री. व्ही. बी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या नियमित सरावाला योग्य दिशा देत त्यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी सक्षमपणे तयार केले.

या उल्लेखनीय यशासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील, संस्थेचे चेअरमन श्री. वा. एन. मजुकर सर तसेच सेक्रेटरी प्रसाद मजुकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यालयाच्या या यशाबद्दल शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us