Home » खानापुरात विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा! ವಿಶ್ವಕರ್ಮ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆ!

खानापुरात विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा! ವಿಶ್ವಕರ್ಮ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆ!

खानापुरात विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

वारकरी भजन मंडळाच्या गजरात चवराशी मंदिर ते शिवस्मारकपर्यंत उत्साहात आयोजन

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील विश्वकर्मा समाज विकास संघटनेच्या वतीने गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. श्री चवराशी मंदिरापासून शिवस्मारकापर्यंत काढण्यात आलेली ही शोभायात्रा वारकरी भजन मंडळाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडली.

विश्वकर्मा जयंती व शोभायात्रेचे उद्घाटन टोपीणकट्टी मठाचे मठाधीश प. पू. श्री रामदास स्वामी महाराज तसेच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव सोमाणा हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वकर्मा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवात सहभाग घेतला.

शोभायात्रेदरम्यान वारकरी भजन मंडळाच्या भक्तिमय गजराने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक वातावरण आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या समाजबांधवांमुळे शोभायात्रेला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष बसवराज सानिकोप, कर्नाटक राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते व माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, अभियान तालुका संचालक व माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, तालुका भाजपा प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ, तालुका उपाध्यक्ष चेतन मनेरिकर, भारतीय जनता पार्टी रयत मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील, शंकर पाटील, अप्पया कोडोली, मोहन पाटील, भरमणी पाटील, सदानंद मासेकर, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सुनीता पाटील यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच विश्वकर्मा समाजातील बांधव-भगिनी आणि वारकरी भजन मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वकर्मा समाज विकास संघटनेचे मंडळ अध्यक्ष जोतिबा सुतार यांनी उपस्थित सर्व मान्यवर, समाजबांधव, भगिनी आणि वारकरी मंडळींचे आभार मानले.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us