Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील झाड नावगा येथे गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घरात आगीचा भडका उडाल्याने घर जळून खाक झाले. सुदैवाने या घरात अडकलेल्या एका वृद्धाला नागरिकांनी सतर्कतेने वाचविले. भडका उडताच आगीने संपूर्ण कौलारू घराला भेट घेतला. गावातील नागरिकांनी तातडीने खानापूर येथून अग्निशामक दलाला पाचारण करून आग विजवण्याचा प्रयत्न झाला. याबाबत मिळालेली माहिती की, खानापूर तालुक्यातील विठ्ठल गावडे या वृद्धाच्या घरी सकाळी स्वयंपाक करत असताना घरातील वृद्धा घराबाहेर पूजेसाठी गेली होती. वृद्ध व्यक्ती विठ्ठल गावडे हे घरातच होते. ते डोळ्याने अंधुक असल्याने नेमके घरात काय घडले त्यांना कळाले नाही. घरातून धुराचा लोट येत असल्याचे कळताच बाजूच्या लोकांनी तातडीने घरात जाऊन डोकावले. त्या वृद्धाला बाहेर काढले. घर कौलारू आहे. घर संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील संपूर्ण जीवनोपयोगी वस्तू,,कपडे लत्ते पूर्णतः जळाले आहेत. तातडीने खानापूर येथील अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजूबाजूला असलेल्या घरांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या आगीच्या भडक्यामुळे सदर गावडे परिवाराचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळून देण्यात यावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us