Oplus_19006496
खानापूर: तालुक्यातील यडोगा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्माई व श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या गुरुवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने उद्या मंगळवार दि. 31 मार्च पासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या असे होणार असून या कार्यक्रमाला दिव्य सानिध आवरोळी मठाचे बसव देवरू हे लाभणार आहेत.
प्रा. नागेश सनदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर माजी आमदार अरविंद पाटील, कोल्हापूरचे युवा उद्योजक आकाश गवाळकर, यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे.
कार्यक्रमात ह भ प ब्रह्मचैतन सद्गुरू प्रभू नामदेव वास्कर महाराज, भाजपा नेते प्रमोद कोजागिरी संजय कुबल, सदानंद पाटील पंडित ओगले, राजू सिद्धांनी, काँग्रेस नेते ईश्वर घाडी, नागराज येळूरकर, संजय हेबाळकर सह अनेकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या निमित्ताने दि. 31 रोजी सकाळी नऊ वाजता गावातून मूर्तींची मिरवणूक निघेल सायंकाळी धार्मिक विधी.
दि. एक एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना त्याच्यानंतर उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री नऊ वाजता ह भ प तुकाराम पवार कोल्हापूर यांचे कीर्तन गुरुवार दि. 2 रोजी सकाळी हनुमान जन्मोत्सव त्यानंतर हळदीकुंकू कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान मंडळ वारकरी मंडळ व ग्रामस्थ पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.