Oplus_16908288

Oplus_16908288


खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तालुक्यातील सावरगाळी व परिसरात जोरात हजेरी लावली. यावेळी सुसाट वाऱ्याच्या तळ्यात येतील सरकारी हायर प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात असलेल्या महाकाय झाडाची फांदी तुटून पडल्याने बाजूला असलेल्या एका महिलेच्या घरावर पडून मोठे नुकसान झाले.

येथील मलप्रभा सन्नाप्पा घाडी या विधवा महिलेच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सदर महिला पत्र्याच्या घरात एकटीच राहते. तिला कोणाचाच आधार नाही. अशा परिस्थितीत शाळेच्या आवारातील झाड सदर महिलेच्या घरावर कोसळल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही. आज शनिवार असल्याने सकाळच्या प्रहरी शाळा भरून सुट्टी झाली होती. शाळेच्या आवारात असलेले महाकाय झाड धोकादायक होते अजूनही या शाळेच्या आवारात काही धोकादायक झाडे आहेत, ती कधी तुटून पडतील याची शाश्वती नाही. यापूर्वीही शाळेच्या आवारातील झाडे हटवून विद्यार्थ्यांच्या धोका टाळावा अशी विनवणी करण्यात आली होती. परंतु याकडे साप दुर्लक्ष झाल्याने या झाडामुळे टांगती तलवार होतीच.

आज सुदैवाने सकाळच्या प्रहारिक शाळा सुट्टी झाल्यानंतर शाळेची मुले नव्हती, नाहीतर शाळेच्या बाजूने एखाद्या झाडाची फांदी तुटून पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सदर विधवा महिलेच्या घरावर झाड पडल्याने तिचे मोठे नुकसान झाले. तातडीने वनखात्याला याबाबत कळवण्यात आले व सदर महिलेच्या घरावर पडलेले झाड हटवण्यात आले. मात्र यामुळे सदर महिलेचे लाखावून अधिक रुपयाचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us