IMG-20250923-WA0019

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

चापगाव येथील दक्षिणमूख हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार हाती घेण्यात आला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य उद्योजक मारुती चोपडे यांच्या पुढाकाराने स्व – खर्चाने लाखो रुपये खर्चातून मंदिराची निर्मिती होत असून मंदिराचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. नुकताच या मंदिरात श्री हनुमान मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याच्या दृष्टिकोनातून मूर्तीला मंदिरात स्थापित करण्यात आले आहे. आता त्या हनुमान मूर्तीला लेपिंग तथा रंगकाम करून मूर्तीला पूर्वरूप आणून त्यामध्ये प्रतिष्ठापना लवकरच करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या मंदिराच्या पूर्णत्वाची जय्यत तयारी मारुती चोपडे यांनी हाती घेतली आहे.

या अनुषंगाने सदर मंदिराच्या उर्वरित कामासाठी सोमवारी ग्रामस्थ कमिटी यांच्या उपस्थितीत चौकट पूजन कार्यक्रम पार पडला. आवरोळी मठाचे पूज्य श्री कलैया स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पडल्या. मंदिराच्या गर्भगुडीत सदर चौकट पूजन करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा उद्योजक मारुती चोपडे यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडल्या. यावेळी गावातील पंच कमिटीचे अध्यक्ष नारायण गोदी, आर्किटेक अभियंते विष्णू बांडगी उचगाव यांच्यासह पंचमंडळी गावातील जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us