Screenshot_2025-09-23-15-47-58-03_7352322957d4404136654ef4adb64504


खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

खास दसऱ्याच्या निमित्ताने चापगाव येथील संयुक्त हनुमान तालीम मंडळाच्या वतीने भव्य फुले कबड्डी स्पर्धांचे आयोजन येत्या गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आले आहे या कबड्डी स्पर्धांमध्ये अनुक्रमे 12001, 8001, 5001 अशी भव्य बक्षीस ठेवण्यात आली आहेत. शिवाय वैयक्तिक बक्षीसही ठेवण्यात आले असून याचा स्पर्धकाने लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धांचे उद्घाटन उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य नागराज यळूरकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महादेव दळवी राहणार आहेत. अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये भाग घेऊन येणाऱ्या संघानी अधिक माहितीसाठी 7259807532, 797495 3820 या क्रमांकाची संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us