IMG_20250827_213052

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
बालकांची जीवन हे एखाद्या फुलाच्या कळीसारखे उंबदे असते. त्या कळीला मनसोक्त जीवन जगण्यासाठी व बालकांच्या जीवनात परिपक्वता आणण्यासाठी आनंदी जीवन आवश्यक आहे. प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला मनसोक्त शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे तरच शैक्षणिक आयुष्यात आपलं मूल उत्तम ज्ञानार्जन करण्यास सक्षम बनेल. विद्यार्थ्यावर कोणताही दबाव न आता मनसोक्त जीवन जगण्यासाठी गुरूंच्या बरोबर पालक व बालकांच्या मैत्रीचे नाते असणे आवश्यक आहे असे विचार समर्थ इंग्लिश मीडियम हायस्कूल चे सचिव डॉ. डी. इ. नाडगौडा यांनी व्यक्त केले नुकताच खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या 2025 26 सालातील पहिला बालक पालक मेळावा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते प्रारंभ शाळेचे मुख्याध्यापक हलगेकर यांनी उपस्थानचे स्वागत व प्रास्ताविक करून शाळेच्या प्रगती विषयी माहिती दिली. व या इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा सह प्रगती विषयी माहिती दिली. यावेळी अनेक पालकांनी आपली मनसोक्त विचार यावेळी मांडले. पालक लबीब शेख यांनीही विद्यार्थ्यांना तसेच गुरुजींना शाळेच्या प्रगती विषयी सूचना मांडल्या. हा पालक मेळावा आला अनेक विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी दिव्या नाडगौड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us