Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यात नेहमी जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या वर वनखात्याने करडी नजर ठेवली आहे. एकीकडे जंगली प्राणी माणसावर हल्ले करून जखमी करत आहेत. अनेकांना अंग विकल करत आहेत त्याकडे मात्र तटकुंजी मदत वन खाते देते तर दुसरीकडे अशाच जंगली प्राण्यांची एखादी शिकार झाली की शिकारी असो किंवा शेतकऱ्यांच्या वर मात्र तस्करीचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई केली जाते अशाच पद्धतीने खानापूर तालुक्यातील लोंडा वन विभागातील नेरसा विभागातील नऊ शिकाऱ्यांना एका हरणाची ( एकरंगी ) शिकार केलेल्या प्रसंगी दिनांक 26 रोजी सायंकाळी पाच वाजता अटक करून त्यांच्या त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असता, नेरसे वन सर्वेक्षण क्रमांक १०२ ला लागून असलेल्या मलकी सर्व्हे क्रमांक १०४/२ मध्ये एकूण ९ आरोपींनी हरणाची शिकार केल्याचे निश्चित झाले. या संदर्भात, वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या कलम ९, ३९, ४४, ५०, ५१ अंतर्गत लोंडा झोन गुन्हे क्रमांक: ०७/२०२५-२६ म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना २७/०६/२०२५ रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. असे वन खात्याने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सदर कारवाई बेळगाव परिमंडळाचे माननीय मुख्य वनसंरक्षक श्री मंजुनाथ चव्हाण आणि माननीय उपवनसंरक्षक श्री मारिया क्रिस्टू बेळगावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. श्रीमती सुनीता निंबर्गी (सहायक वनसंरक्षक, खानापूर उपविभाग), श्री श्रीकांत पाटील (विभागीय वनाधिकारी, खानापूर), श्री सय्यदसाबा नाधापा (विभागीय वनाधिकारी, भीमागड), आणि श्री वाय.एस. पाटील (उपविभागीय वनाधिकारी, लोंडा) आणि खानापूर आणि भीमगड झोनचे अधिकारी उपस्थित होते तर कारवाई केलेल्या शिकारी मध्ये रणजित जयसिंग देसाई, बळवंत नारायण देसाई, आत्माराम यल्लप्पा देवळी, प्रमोद नामदेव देसाई, दत्तराज विलास हवालदार, ज्ञानेश मंगेश गावडे, गोविंद रामचंद्र देसाई, अप्पी इंगाप्पा हनबर, बारप्पा बाबू हनबर आदींचा समावेश आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us