हलशी: येथील सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवारी उत्साहात पार पडला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नरसिंग घाडी होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या इशस्तवन व स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती एम. डी मधाळे यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन व द्वीपप्रज्वलन करण्यात आले. शिक्षिका श्रीमती एस आर पाटील यांनी अहवाल वाचन केले
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदगड केंद्राचे सीआरपी श्री दादापीर बागवान, बीजगर्णी केंद्राचे सीआरपी कोलकार, घोटगाळी शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही चौगुले, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शाहिदा मुजावर, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री एल. डी पाटील उपस्थित होते.
प्रमुख वक्ते नरसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री जी. एन यांनी आपल्या भाषणांमधून संस्काराचे महत्व सांगून मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. श्री एल. डी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाळा सुधारणा कमिटी सदस्यांचा सत्कार तसेच माजी मुख्याध्यापक एल. डी. पाटील यांचा निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. एस.एच. चवलगी व कन्नड शिक्षिका श्रीमती डी एस मुंडोळी यांनी बक्षीस वितरणाचे सत्र सांभाळले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सूत्रसंचालन श्रीमती व्ही. एस माळवी यांनी केले तर आभार शिक्षक एम. एन जाधव यांनी केले.