Home » कन्या विद्यालयत राष्ट्रीय विज्ञान दिन

कन्या विद्यालयत राष्ट्रीय विज्ञान दिन

Screenshot_2023_0302_180936

नंदगड – आधुनिक जग वैज्ञानिक युगाकडे झपाट्याने वाढत चालले त्यामुळे आधुनिक शिक्षण आणि वैज्ञानिक शिक्षण ही काळाची गरज बनली आहे शिक्षण घेत असताना किंवा कोणतेही विधायक काम करत असताना सहानुभूती मिळवण्यापेक्षा संकटांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण केले तरच तो व्यक्ती जीवनात नक्की यशस्वी होऊ शकतो असे विचार वैयक्तिक सल्लागार आणि संस्कृती एज्युक्युअर चे संस्थापक तेजस कोळेकर यांनी व्यक्त केले नुकताच नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालय नंदगड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समिती नेते व शाळा कमिटीचे अध्यक्ष पुंडलिक हनुमंतराव चव्हाण होते.

प्रमुख पाहुणे म्हणून भुवराह खानापूर प्रोड्यूसर कंपनी लिमटेड चे अध्यक्ष श्रीनिवास धोत्रे, सी.ई.ओ श्री प्रवीण पाटील, शाळा सुधारणा कमिटी सदस्य नारायण गुरव, मारुती गुरव, सुदेश दलाल, नरसिंग पाटील सदस्य नेहा नाईक, दीक्षा बेळगावकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत मुख्याध्यापक एस. एम. कदम सर यांनी केले पाहुण्यांचा परिचय श्रुतिका पाटील यांनी करून दिला.

विद्यार्थिनींनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान नाटक सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका सौ. एन. देसाई यांनी केले तर आभार सी. आय. पाटील यांनी केले

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us