Screenshot_20231124_124837

संपादकीय ▶ खानापूर / पिराजी कुऱ्हाडे

भारतीय हिंदु धर्मात तुलसी विवाह परपरेला विशेष प्राधान्य दिले जाते. कार्तिक व्दादशी शुभमुहुर्तावर होणाऱ्या या तुळसी विवाहानंतर विवाहानंतर हिंदू धर्म परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरात विवाह समारंभ आयोजनास मुभा मिळते. तुळसी विवाहनंतर विवाह जमवण्यासाठी वधू-वराची निवड करुन लग्न सोहळ्याचे उधाण सुरु होते. ते आषाढी एकादशीच्या काळापर्यंत चालतात, आषाढी पौर्णिमेनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाह करणे अथवा जमवणे जमवणे हिंदू धर्मात केले जात नाहीत म्हणून तुलशी विवाह नतर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची परंपरा आजही अवगत आहे. तुलशी वृदावन हे हिंदूचे प्रतिक मानले जाते. प्रत्येक घरासमोर तुळस असतेच सकाळी तूळशी समोर रांगोळी टाकून पूजा पूजा करणे करणे हे सुवासिनिचे नित्य काम असते. आजही परपरा शहरी भागासह खोडेगावात सजलेली आहे. हिंदू धर्मात तुळशी विवाह परपरेला अधिक महत्त्व आहे. आषाढी एकादशी नंतर कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मासाच्या काळात विशेषतः हिंदू धर्मात विवाह सोहळे केले जात नाहीत पण अलीकडच्या काळात याही ही परंपरेला फाटा मिळत असला तरी धार्मिकच रीतिरिवाज पाळणारे हिंदू धर्मीय तुळशी विवाहानंतर लग्न सोहळ्याला सुरुवात करतात.

तुळस म्हणजे अंगणातील ‘काशीच,

तुळस म्हणजे अंगणातील ‘काशी’च, तिची केलेली पूजा, मनोभावे केलेली सेवा सर्व देवांना पोहोचते अशी मनाची समजूत आहे .म्हणूनच संपूर्ण दिवसभर राबण्याचे बळ तुळशीवरची श्रद्धाच स्त्रियांना देते. पूर्वीची मातीची घरे त्याच्यासमोरच असलेले सुबकशे अंगण व त्या अंगणाची शोभा वाढविणारी मातीचीच तुळस. रुजविलेले तुळशीचे रोप व अंगणाच्या कडेकडेला असलेल्या विविध तऱ्हेच्या झाडात तुळशीची रोपे ही आत्मयितेने डोलताना दिसतात. वारकरी स्त्रिया पंढरपूरच्या वारीला जाताना डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जातात. तुळशीमाळ गळा घालून सावळ्या विठुरायाला ओळवाताना वारकरी महिलांचा आनंद व्दिगुणीत होतो. तुळशीची हिरवी निळसर झाक असलेली पाने सावळ्या विठ्ठलाशी कृष्णाशी तन्मय होतात. लोकमनाने तर तुळशीला फुगडीगीते, कोळी गीते, ओव्या यांमधून अजरामर केलेले आहे. पाना- फुलांवरून रचलेली असंख्य लोकगीते तुळशीचे जनमानसातील स्थानच स्पष्ट करते.

शाळीग्रामचा अवतार बाळकृष्ण हा तुळशीचा वर :

तुळसी विवाहाला प्रारंभ झाल्याने घराघरातील तुळसी विवाहाला रंगरंगोटी करुन सजवणे, ज्यांच्या घरी तुळसी स्थापन केली नाही. अशानी लहान मोठया आकारातील आकर्षक तुळसी वृंदावन खरेदी करुन विवाह सोहळे केले जातात. तुळसीच्या लग्नासाठी लागणार सौभाग्य लेण, नवीन वस्त्र, लागणाऱ्या चिंचा, आवळे, फळे, फुले आदीनी तुळसी वृंदावनाला सजवण्याची प्रथा आहे. तुळशीचे लग्न हा पुजोत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, शाळीग्रामचा अवतार बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. तुळसी वृदावनात रंगरागोटी करुन सजवले जाते तुळसीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावना सभोवार ऊस उभारुन आवळे, चिंचा त्यामध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज तसेच नेवैद्य अर्पण करुन तुळसीमध्ये आळवणी केली जाते. त्यानंतर तुळशीची षोडशोपचाराने पूजा करुन सौभाग्यलेन आदी अलंकारीत करुन सजविले जाते. तुळस आणि श्रीकृष्ण विवाह समयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुसऱ्या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघामध्ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वाना अक्षता बाटल्या जातात, मंगलाष्टकाने तुळशीचा विवाह केला जातो.

तुळशीच्या पानाला अधिक महत्व

तुळशीच्या रोपाची पूजा केली की पापे नष्ट होतात. आयुरारोग्य प्राप्त होते, ही श्रद्धा आज याचा अर्थ लावला तर असा विचार करता येईल की, तुळशीच्या पानांचा रस जर नित्यनियमाने प्राशन केला तर मुखाचे सर्व विकार तर नष्ट होतात. त्याबरोबर आतून शरीरशुद्धीही होते. अंगणात मोठ्या प्रमाणात रोपे लावल्याने परीसराचीही स्वच्छता होते. रोगप्रतिकार रोपामुळे होत असल्याने आरोग्याची प्राप्ती होते. निसर्गाचे हे तत्त्व लोकमानला गवसले होते. म्हणूनच त्याना अंगणातच मातीच्या प्रतिकात्मक तुळशी वृंदावनात दिले.

तुलशी विशेषतः तुळसी विवाह हा गोरज मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात तुळसी विवाहप्रसंगी परिसरातील नागरिकाना रिलसूर पाहुणचार म्हणून बोलाविण्याची परपरा आहे. तुळसी विवाहाला बोलावणे झाले की आजू‌बाजूचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. तुळसी विवाह परप्रा ही हिंदू धर्मात पावित्र मानली जाते. कारण तुळसीच्या लग्नानंतर धार्मिच्छ पस्परेनुसार लग्न जुळवण्याची प्रथा आहे तुकशीच्या पानाला अधिक महत्व आहे. तुळशीच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण तर गंगा स्नानच. तुळशी पत्र असेल मरलेली व्यक्ती वैकुटास जाते असा समज आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us