खानापूर :फोटो : शिंदोळी : ध्वजारोहणासाठी सज्ज झालेल्या तलावाच्या काठावर विविध गावातून आणलेली माती जमा करताना ग्रामपंचायत कर्मचारी.
खानापूर लाईव्ह न्युज/ खानापुर ;
संपूर्ण देशभरात 76 वा भारतीय स्वातंत्र्यदिन केला जात आहे. भारत सरकारने यावर्षीही हर घर तिरंगा झेंडा अभियान यावर्षीही राबवले आहे.
या आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नरेगा अंतर्गत अनेक गावात तलावा निर्मिती करण्यात आली आहे. त्या प्रत्येक तलावाच्या बांधावर तिरंगा फडकवण्याचा निर्धार आला आला आहे. या अनुसार खानापूर तालुक्यात 14 तलावामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र यापैकी आतापर्यंत पूर्णत्वाला आलेल्या 8 ठिकाणी हा तिरंगा फडकवण्यात येणार आहे. शेती, पाणी आणि निसर्ग प्रेमाची महत्त्वाची सांगड घालण्यात आली आहे. रोहयो मजुरांनी तयार केलेल्या तलावांच्या काठावर ध्वजारोहण करून लोकसहभागातून तयार तलाव तलावांमध्ये स्थानिक शहीद लोकांचे नाव प्राप्त झाले आहे
गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘अमृत सरोवर’ ही योजना सुरू केली. रोहयोतून एका तलावाची निवड करून त्याचा समग्र विकास करण्याची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यात 22 तलावांची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी आठ तलावांची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार ज्या तलावांचे काम पूर्ण झाले आहे. त्या ग्रामपंचायतीने तलावाच्या काठावरच सामूहिक ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडावा असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे तलावांच्या काठावर ध्वज स्तंभांची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत एखादा जवान शहीद झालेला असल्यास त्या शहीदाचे नाव तलावाला देण्यात येणार आहे. जवानाच्या नावाचा फलक देखील लावण्यात येणार आहे.
संदेशदर्शक नाम फलक
तलावाच्या बांधावर करण्यात आलेल्या नाम फलकावर संदेश दर्शक फलक लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गाव परिसरात असलेला एखादा शहीद जवान, ग्रामपंचायतचे नाव, पंतप्रधानांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संदेश कोरण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकही जवान शहीद झालेला नाही. तेथे महात्मा बसवेश्वर यांचे वचन कोरले जाणार आहे.
ज्या गावात तलाव उपलब्ध नाही. तेथे शाळेच्या आवारात किंवा ग्रामपंचायतच्या आवारात शिलाफलक लावण्यात येणार असल्याचे रोहयोचे सहायक संचालक शेखर हिरेसोमन्नवर यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यात सध्या आठ तलाव पूर्ण झाल्याने त्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील शहिदांची नावे तेथील तलावांना दिली जाणार आहेत. ही नावे सैन्य दलाकडून मिळवण्यात आली आहेत.
शेती आणि मातीशी नातं घट्ट करण्याचा प्रयत्न
‘आमची माती आमची माणसं’ या संकल्पनेंतर्गत प्रत्येक गावातून मूठभर माती ग्रामपंचायतच्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायती ही माती 15 ऑगस्ट रोजी तालुका पंचायतीकडे जमा करणार आहेत. 16 ते 20 ऑगस्ट पर्यंत तालुका पंचायतीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यानंतर संकलित केलेली माती बेळगाव जिल्हा पंचायतीला आणि तेथून राज्य व त्यानंतर राजधानी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. या उपक्रमातून शेती आणि मातीशी नातं घट्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.