खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील शिक्षकांची प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या दि खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. दोन्ही गटाच्या संगणमताने 15 सदस्यांची निवड बिनविरोध करण्याचा निर्णय ऐनवेळी झाला. निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार वेळेत अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेल्याने निवडणूक प्रक्रिया लादली गेली. पण निवडणूक प्रक्रिया लादल्यानंतर दोन्ही गटाच्या प्रमुखांनी एकूण उमेदवारी अर्ज केलेल्या 30 इच्छुकांना एकत्रित करून 15 उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. व या संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णयही झाला होता. पण रविवारी नियमानुसार ठरलेली निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेणे क्रमपात्र ठरवले. त्यामुळे रविवारी सकाळपासून विद्यानगर मधील सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सोसायटीच्या दोन्ही गटाच्या प्रमुखासह बिनविरोध झालेल्या संचालक मंडळातून या ठिकाणी दिवसभर ठाण मांडून होणाऱ्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अवचितपणे मतदार येऊन मतदान करतील आणि घेतलेला निर्णय फोल ठरेल ही धास्ती दिवसभर दोन्ही गटाच्या प्रमुखासह उमेदवारात लागून राहिली होती. पण खानापूर तालुक्यातील जवळपास 400 सभासद शिक्षकांनी गटप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाला प्रतिसाद देत आज निवडणूक प्रक्रियेकडे पाठ फिरवली. व सोपस्कार प्रक्रिया पार पडून या निवडणुकीत 15 संचालकांची निवड करण्यात तालुका शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यशस्वी ठरले आहेत.
संचालक पदी निवड झालेले उमेदवार :
सामान्य गट
1) श्री वाय्. एम्. पाटील
2) श्री बी. बी. चापगावकर
3) श्री के. एच्. कौंदलकर
4) श्री सतीश एल्. हळदणकर
5) श्री जे. पी. पाटील
6) श्री डी. एस्. सोनारवाडकर
7) श्री महेश व्ही. कुंभार
8) श्री नेताजी एल्. शिवनगेकर
9) श्री लक्ष्मण व्ही. गुरव
OBC अ वर्ग
1) श्री आय. जे. बेपारी
OBC ब वर्ग
1) श्री शिवानंद एम्. पाटील
महिला
1) श्रीमती मीरा एस्. पाटील
2) सौ. जयश्री आ. मुरगोड
परिशिष्ट जाती
1) श्री प्रकाश एस्. मादार
परिशिष्ट वर्ग
1) श्री बी. बी. मेदार अशी निवड झालेल्या शिक्षक संचालकांची नावे आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.