file_000000003a3482308801dbd82bf4f782


बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत खानापूर तालुक्यातील गुंडपी गावचा सुपुत्र सुशीलकुमार पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
१४ वर्षांखालील गटातील ट्रायथलॉन ‘बी’ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुशीलकुमारने राज्यस्तरीय स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे गुंडपी गावासह संपूर्ण खानापूर तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.
सुशीलकुमार हा सर्वोदया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत असून, तो सध्या ज्योती स्पोर्ट्स क्लब, बेळगाव येथे नियमित सराव करत आहे. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने हे यश संपादन केले आहे.
त्याच्या राज्यस्तरीय निवडीबद्दल पालक, शिक्षक, प्रशिक्षक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही तो उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us