पुरुष, महिला व विद्यार्थी गटात होणार स्पर्धा; विजेत्यांना रोख बक्षिसांसह मानचिन्ह
खानापूर : लोकमान्य संचालित वागळे पदवीपूर्व कॉलेज, खानापूर आणि श्री चौराशीदेवी संगीत कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता लोकमान्य भवन, खानापूर येथे संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पुरुष गट, महिला गट आणि विद्यार्थी गट अशा तीन गटांत होणार आहे. पुरुष व महिला गटासाठी स्पर्धेची वेळ १५ मिनिटे असून प्रवेश शुल्क ५०१ रुपये आहे. विद्यार्थी गटासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही.
पुरुष गटातील बक्षिसे :
प्रथम ₹७,००१, द्वितीय ₹६,००१, तृतीय ₹५,००१, चतुर्थ ₹४,००१, पाचवे ₹३,००१, सहावे ₹२,००१ आणि सातवे ₹१,५०१.
महिला गटातील बक्षिसे :
प्रथम ₹२,५००, द्वितीय ₹२,१००, तृतीय ₹२,०००, चतुर्थ ₹१,८०१, पाचवे ₹१,६०१, सहावे ₹१,५०१ आणि सातवे ₹१,२०१.
विद्यार्थी गटातील बक्षिसे :
प्रथम ₹२,५०१, द्वितीय ₹२,००१ आणि तृतीय ₹१,५०१ अशी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह देखील प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरी परब, व्हा. चेअरमन लोकमान्य एज्युकेशन सोसायटी तथा संचालक लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटोपूजन करण्यात येणार आहे.
संगीत व भजनप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.